ETV Bharat / bharat

Bageshwar Baba : बागेश्वर बाबांच्या दरबारात चेंगराचेंगरी ; 10 जखमी, अनेक महिला बेशुद्ध

बुधवारी ग्रेटर नोएडा येथील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, बाबांच्या दरबारात चेंगराचेंगरी झालीच नाही. काही व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आहेत, असे आयोजकांचे म्हणणे आहे.

stampede at bageshwar baba program
बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी
author img

By

Published : Jul 12, 2023, 10:47 PM IST

पहा व्हिडिओ

नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडा येथे बुधवारी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी कथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत 10 जण जखमी झाल्याची माहिती असून अनेकजण बेशुद्ध झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक महिला बेशुद्ध पडल्या : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नोयडा येथे दिव्य दरबाराचे आयोजन केले होते. लोकांनी सांगितले की, व्हीआयपी पासच्या मागे असलेल्या छोट्या गेटमधून प्रवेश दिला जात होता. तेथे विजेच्या तारा लागून एका महिलेला शॉक बसला. तर अतिउष्णतेमुळे मंडपातील अनेक महिला बेशुद्ध झाल्या. यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी तडक अ‍ॅक्शन घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कार्यक्रमस्थळी अपेक्षेपेक्षा जास्त भाविक पोहोचले : धीरेंद्र शास्त्रींच्या या दिव्य दरबारात अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या संख्येने भाविक पोहचले होते. हे सर्व धीरेंद्र शास्त्रींची एक झलक पाहण्यासाठी उतावळे दिसत होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी भाविकांना दिव्य दरबार संपल्याचे सांगितले आणि लोकांना घरी परतण्याची विनंती केली. लोकांना धीरेंद्र शास्त्रींचे प्रवचन घरूनच ऐकण्यास सांगण्यात आले. त्यांचा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित केला जात होता.

रुग्णांवर जिम्समध्ये उपचार सुरू : दिव्य दरबारात जखमी झालेल्यांना राज्य वैद्यकीय विज्ञान संस्था, जिम्सच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले की, येथे 3 महिला आणि एका पुरुषाला दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेला उपचारानंतर परत पाठवण्यात आले आहे. गर्दीत गुदमरल्याने चौघांनाही त्रास झाला होता. रुग्णालयात दाखल असलेल्या तिन्ही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

चेंगराचेंगरी झालीच नाही-आयोजक : दुसरीकडे, बाबांच्या दरबारात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. काही व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आहेत. दिव्य दरबारामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मात्र व्यवस्थापन समिती व प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सर्व काही व्यवस्थित पार पडले, असे ते म्हणाले. ग्रेटर नोएडातील जैतपूर गावाजवळ 10 जुलैपासून बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याहस्ते श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 16 जुलैपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा :

  1. Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.