चेन्नई : M K Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) च्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पक्षाच्या सर्वसाधारण सभेत त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
स्टॅलिन यांनी येथे पक्ष मुख्यालय अण्णा अरिवल्यम येथे पोहोचून पक्षाच्या प्रमुख पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यमंत्री दुरईमुरुगन, खजिनदार टी आर बालू, खासदार कनिमोझी आणि ए राजा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना द्रमुकच्या युवा शाखेचे सचिव आणि आमदार उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.