कांकेर (छत्तीसगढ) - कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर आणि नर्सेस आपल्या सुख सोयींचा त्याग करत लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. या काळा अनेक ठिकाणी डॉक्टर, नर्सेस रूग्णांसोबत डान्स करताना तर कुठे रूग्णांचा ताण कमी करण्यासाठी विविध उपाय करताना दिसून येत आहे. अशा विविध प्रकारचे फोटोज सध्या आपण समाज माध्यमात पाहत आहोत. असाच एक फोटो पखांपूरमधून पुढे आला आहे. नर्स पीपीई किट घालून जमिनीवर बसून थोडं आराम करताना दिसून येत आहे. सध्या हा फोटो समाज माध्यमात प्रचंड व्हायरल होत आहे.
पीपीई किटमध्येच जमिनीवर झोपली नर्स
नर्स कोरोना रूग्णालयात आपले काम करताना पीपीई किट घालून जमिनीवरच झोपली. या नर्सचे नाव लीलासनी कोडोपी असे आहे. त्या पखांपूर सामान्य रूग्णालयात कार्यरत आहेत. लीलासनी ह्या सध्या आयटीआय कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करत आहे. रूग्णांची सेवा करता करता त्यांना थकवा आला आणि त्या जमिनीवरच आराम करू लागल्या.
समाज माध्यमात व्हायरल होत आहेत लीलासनीची फोटो
लीलासानी सारख्या अनेक आरोग्य कर्मचारी रात्र दिवस आपली सेवा देत आहे. समाज माध्यमात लीलासानी यांची फोटो व्हायरल होताच लोकांकडून त्यांचा कौतुक करण्यात येत आहे. या फोटोवर काही लोकांनी प्रतिक्रिया देतांना लिहिले आहे की, आपण या भीषण गर्मीमध्ये एसी आणि कुलरची हवा घेत आहोत.
मात्र, या कडक उन्हात पीपीई किट घालून आरोग्य कर्मचारी रूग्णांची सेवा करत आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी लिहिले आहे की, आपण कोरोनाबाधित रूग्णांपासून पळ काढतो. आरोग्य कर्मचारी मात्र त्याच कोरोनाबाधितांची सेवा करत आहे. हे आरोग्य कर्मचारीही कोणाचे नातेवाईक, मुलं मुली आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान व्हायला हवा, त्यांच्यासोबत आदराने वागायला हवे. अशा विविध प्रतिक्रिया या फोटोवर येत आहे.