ETV Bharat / bharat

World Para Athletics Grand Prix: धावपटू प्रशांत देसाईने भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक - क्रीडाच्या मराठी बातम्या

सध्या सुरू असलेल्या दुबई पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2022 ( World Para Athletics Grand Prix 2022 ) मध्ये भारताने पदकांची संख्या 4 वर नेली आहे. गुणतालिकेत भारत 15व्या स्थानावर आहे. 22 वर्षीय पॅरा अ‍ॅथलीट देसाई शर्यतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडीवर होता. बुधवारी थ्रो खेळाडू भारताला पदक मिळवून देण्यात अपयशी ठरले.

Pranav Prashant Desai
Pranav Prashant Desai
author img

By

Published : Mar 24, 2022, 6:08 PM IST

दुबई: धावपटू प्रणव प्रशांत देसाईने ( Runner Pranav Prashant Desai ) दुबई वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स-१३व्या फैजा इंटरनॅशनल पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या 200 मीटर T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताचे नाव रोशन केले आहे. दुबई क्लब फॉर पीपल ऑफ डिटरमिनेशन ग्राऊंडवर थ्रोर्स अडखळल्याने या दिवशी भारतासाठी हे एकमेव पदक होते.

देसाईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवटपर्यंत आघाडीवर राहत त्याने 24.42 सेकंदात शर्यत पूर्ण केली. थायलंडचा डेनपूम कोचरांग ( Denpum Kochrang of Thailand ) (25.78 से.) आणि नॉर्वेचा केनेथ जेन्सन हेगडाल ( Kenneth Jensen Hegdal of Norway ) (27.08 से.) च्या मागे होते.

देसाई म्हणाला की, ''मी येथे सुवर्णपदक जिंकण्यासाठी आलो असून या शर्यतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेतृत्त्व केल्याचा मला आनंद आहे. इथे परत आल्यावर आनंद झाला. गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या स्टॅमिना आणि पेसवर काम करत आहे. माझ्या योजना येथे कार्यान्वित करण्यात आनंद झाला.''

भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र ( Sports Authority of India Center ), गांधीनगर येथे प्रशिक्षण घेतलेले 22 वर्षीय देसाई म्हणाला, "आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतासाठी 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये सुवर्ण जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. जे पॅरिस 2024 पॅरालिम्पिकसाठी माझा मार्ग मोकळा करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.