ETV Bharat / bharat

न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबतचा माध्यमातील शक्यतेचा रिपोर्ट अत्यंत दुर्दैवी - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा - कॉलेजियम नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी माध्यमांतील रिपोर्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कारण, माध्यमांनी थेट सर्वोच्च न्यायलायातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत शक्यता व्यक्त करणारी माहिती दिली.

सरन्यायाधीश एन व्ही रमणा
सरन्यायाधीश एन व्ही रमणा
author img

By

Published : Aug 18, 2021, 5:21 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची शक्यता व त्याबाबतचा माध्यमातील रिपोर्ट अत्यंत दुर्दैवी असल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नवीन सिन्हा यांच्या निरोप समारंभात बोलत होते.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, की न्यायाधीशांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया अत्यंत पवित्र आहे. त्याच्याशी पावित्र्य जोडलेले आहे. माध्यमांनी हे पावित्र्य समजून घ्यावे आणि ओळखावे, असेही सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले.

हेही वाचा-4 मुलांची आई 21 वर्षीय तरुणाच्या प्रेमात झाली वेडी, पुढे काय झाले वाचा सविस्तर...

पुढे सरन्यायाधीश म्हणाले, की याप्रसंगी माध्यमातील काही शक्यता आणि रिपोर्टबाबत चिंता व्यक्त करण्याचे मी स्वातंत्र्य घेऊ इच्छितो. तुम्हाला माहित आहे,की न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची गरज आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत बैठक होणार असून निर्णय घेतला जाणार आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया पवित्र आहे. निश्चितच त्याच्याशी काही सन्मान जोडलेला आहे. माझ्या माध्यम मित्रांनी हे समजून घेतले पाहिजे. या पवित्र प्रक्रियेला जाणून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाकडून माध्यमांच्या स्वातंत्र्याचा व नागरिकांच्या हक्कांचा आदर केला जातो. प्रक्रिया प्रलंबित असताना आणि निर्णय होण्यापूर्वीच काही माध्यमांमध्ये त्यावर टीका केली जाते.

हेही वाचा-लखनौमधील हनी ट्रॅप गँगमध्ये अडकलेल्या उस्मानाबादच्या शिक्षकाची आत्महत्या; पोलिसांचा उत्तरप्रदेशात तपास सुरू

प्रोफेशनल पत्रकार आणि नीतिमान माध्यमे ही लोकशाहीची खरे बलस्थाने

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले, की काही चुकीच्या, बेजबाबदार शक्यता आणि रिपोर्टमुळे काही बुद्धिवान प्रतिभेलाही करियरच्या प्रगतीत अडथळे आल्याचे दिसून आले आहे. ही खूप दुर्दैवी आहे. त्याबाबत मी खूप निराश आहे. प्रोफेशनल पत्रकार आणि नीतिमान माध्यमे ही सर्वोच्च न्यायालयाचे आणि लोकशाहीचे खरी बलस्थाने आहेत. तुम्ही व्यवस्थेचा भाग आहात. सर्व घटकांकडून या संस्थेचा एकसंधपणा आणि सन्मान राखला जावा, अशी मी अपेक्षा करतो.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याबाबत कॉलेजियमविषयी माध्यमांत रिपोर्ट आले आहेत. त्यावरून सरन्यायाधीशांनी आपले मत मांडले आहे.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून 3 महिला न्यायाधीशांसह 9 जणांची शिफारस

माध्यमांनी न्यायाधीश नियुक्त्यांबाबत काय म्हटले?

सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तीन महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना (कर्नाटक दिल्ली उच्च न्यायालय), न्यायाधीश हिमा कोहली (तेलंगाणा उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी (गुजरात उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. या तिन्ही महिला न्यायाधीशांपैकी एका महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरिमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 25 वर आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची 34 पदे मंजूर आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई हे 19 मार्च 2019 रोजी निवृत्त झाल्यानंतर बढती होऊन सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.