बंगळुरू - कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाकरिता मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची सोमवारी दुपारी 2 वाजता भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यावर राज्यपालांनी सोमवारी वेळ देण्याची तयारी दर्शविली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अद्याप, राज्यपाल व मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भेटीची अंतिम वेळ निश्चित झाली नाही.
हेही वाचा-Kulgam Encounter : कुलगाममध्ये लष्कराची मोहीम फत्ते! एका दहशतवाद्याचा खात्मा
विश्वासू मंत्र्यांशी करणार चर्चा मुख्यमंत्री येडियुरप्पा
सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेत 11 ते 1 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुरप्पा सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते विधानसभेत असलेल्या त्यांच्या कार्यालयात असणार आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा हे त्यांच्या विश्वासू मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हे राज्यापालांची दुपारी 2 वाजता भेट घेणार आहेत.
हेही वाचा-जम्मू आणि काश्मीर - बांदीपुरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; जवान जखमी
मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीना देणार का, याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. हे सर्व हायकंमाडवर असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे उद्या राजीनामा देणार का? की केवळ राज्यपालांची भेट घेणार? याबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे.
अशी आहे येडियुरप्पा यांची कारकीर्द
१९८३ साली येडियुरप्पा पहिल्यांदा शिकारीपूरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
येडियुरप्पा हे चांगले काम करत आहेत- जे. पी. नड्डा
गोवा दौऱ्यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी उशिरापर्यंत आमदार व स्थानिक नेत्यांच्या बैठका घेतल्या. यामध्ये नेत्यांना निवडणुकांबाबत काही सुचना केल्या असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे मुख्यमंत्री पादावरुन पायउतार होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्या संदर्भाने पत्रकारांनी नड्डा यांना प्रश्न विचारला असता, येडियुरप्पा हे चांगले काम करत आहेत. कर्नाटक राज्य त्यांनी चांगले चालवले आहे, अशी प्रतिक्रियी दिली आहे. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी हे उपस्थित होते.