कोलकाता - महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना न्याय हवा आहे, असे त्या म्हणाल्या. ममता म्हणाल्या की, कोणाचाही पक्ष फोडण्याचा प्रयत्न करू नये, कारण आज भाजपची सत्ता असेल, पण उद्या ती सत्तेत नसेल तेव्हा त्यांचाही पक्ष तोडू शकतील.
ममता म्हणाल्या की, आज भाजप सत्तेत आहे. पण उद्या तुम्ही सत्तेत नसाल आणि दुसरा कोणीतरी तुमचा पक्ष फोडू शकेल. पैसा, सत्ता आणि माफियांच्या जोरावर तुम्ही आज शिवसेना तोडत आहात. मी अशा राजकारणाचे समर्थन करू शकत नाही.
तृणमूल काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा म्हणाले की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा 55 लाख लोक पुरामुळे बाधित झाले असताना आणि 89 लोकांना आपला जीव गमवावा लागला असताना महाराष्ट्रातून आलेल्या आमदारांचे 'शाही आदरातिथ्य' करण्यात गुंतले आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे द्वेषपूर्ण राजकारण असून त्यामुळे राज्यातील जनतेसाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.
पूरग्रस्त रस्ते आणि घरांची छायाचित्रे शेअर करत तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी ट्विट केले की, “मी ऐकले आहे की महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये शिकार मोहिमेवर आले आहेत. आसामचे काही भाग पुरामुळे प्रभावित झाले आहेत, जिथे पिण्याचे पाणी आणि वीज नाही. कृपया हिमंता बिस्वा सरमा यांचे लक्ष विचलित करू नका, त्यांनी या चिंताजनक परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - PM Modi Hyderabad Visit : पंतप्रधान मोदी हैदराबादच्या दौऱ्यावर.. शहरात पोलिसांसह 'स्नायपर्स'ची तैनाती