ETV Bharat / bharat

'म्यूकरमायकोसिस रूग्णांना दिलासा द्या'; सोनिया गांधींचे मोदींना पत्र - सोनिया गांधींचे मोदींना पत्र

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात म्यूकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) वाढते रुग्ण आणि आवश्यक औषधांच्या कमतरतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : May 22, 2021, 3:12 PM IST

Updated : May 22, 2021, 7:05 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा देशात वेगाने प्रसार होत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशावर कोरोनाचे संकट असतानाचा आता म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नावाच्या रोगाचा प्रसार होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशात म्यूकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) वाढते रुग्ण आणि आवश्यक औषधांच्या कमतरतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. पत्राद्वारे त्यांनी मोदींना ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली

ब्लॅक फंगसला साथीचा रोग जाहीर करण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. 'साथीचा रोग जाहीर करणे म्हणजेच त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे पुरेसे उत्पादन व पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. रूग्णांना नि: शुल्क सेवा देणे आवश्यक आहे', असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं.

'अ‍ॅम्फोटेरिसिन-बी' हे या आजाराच्या उपचारांसाठी आवश्यक औषध आहे. तथापि, बाजारात या औषधाची तीव्र कमतरता असल्याचे वृत्त आहे. तसेच, हा आजार आयुष्मान भारत आणि इतर अनेक विमा अंतर्गत येत नाही. त्यामुळे सरकारने 'म्यूकरमायकोसिस'रूग्णांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत', अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

ब्लॅक फंगस रोगाचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘अ‍ॅम्फोटेरिसिन-बी’ या औषध निर्मितीसाठी आणखी पाच कंपन्यांना परवाना मिळाला आहे. प्रत्येकजण हे औषध वापरत आहेत. जुलैपासून महिना 1,11,000 बॉटलचे उत्पादन सुरू केले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

गुरुवारीही लिहले होते पत्र -

यापूर्वी कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती. पालकांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे. अशी मागणी त्यांनी केली होती.

Last Updated : May 22, 2021, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.