ETV Bharat / bharat

सोनिया गांधींनी बोलावली AICC ची बैठक; कोरोना आणि इंधन दरवाढीवर चर्चा - काँग्रेस

कोरोना महामारी आणि इंधन वाढीव किंमतींबाबत काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी गुरुवारी आभासी बैठक घेणार आहेत. पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारीही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी
author img

By

Published : Jun 24, 2021, 10:17 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची (एआयसीसी) बैठक बोलावली आहे. या आभासी बैठकीत पक्षाचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारला घेरण्यासंदर्भात चर्चा होईल. याशिवाय कोरोना साथीची सद्यस्थिती आणि देशाची राजकीय परिस्थिती यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेल आणि आवश्यक खाद्यपदार्थाच्या किंमती वाढीसंदर्भात पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा केली जाईल. कोविडची सद्यस्थिती आणि आर्थिक परिस्थिती यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. यानंतर राज्य काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठकही बोलविण्यात येणार आहे. जुलैमधील संसदेच्या अपेक्षित पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक बोलावण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस गेल्या काही आठवड्यांपासून सरकारवर सातत्याने हल्ले करीत आहे.

यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी केंद्राकडे पैसे नाहीत, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटलं. मात्र, सेंट्रल व्हिस्टासाठी 20 हजार कोटी रुपये केंद्राकडे आहेत. 2020-21 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या लूटातून जमा झालेली तीन लाख 89 हजार 662 कोटी रुपये कुठे गेले ? असा सवाल सुरजेवाला यांनी टि्वटमधून केला होता.

इंधन दरवाढ सुरूच -

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. आज पेट्रोलमध्ये 26 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे, तर डिझेलमध्येही 7 पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या पुढे गेली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रथमच ब्रेंट क्रूडच्या किंमतीने ही पातळी ओलांडली आहे. दिल्लीत पेट्रोल आज प्रतिलिटर 97.76 रुपये तर डिझेल 88.30 रुपये प्रतिलिटर झाले. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 103.89 रुपयांवर पोहचले आहे. डिझेलची किंमत 95.79 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 97.63 रुपये आणि डिझेल 91.15 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर ते अनुक्रमे 98.88 आणि 92.89 रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.