ETV Bharat / bharat

बिहार: मुझफ्फरपूर जिल्ह्यात मुलाने आई-वडिलांची केली हत्या - आई वडील हत्या जाफरपूर खुटाही

जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर ( Son kill mother father in Muzaffarpur ) आली आहे. एका मुलाने त्याच्या आई वडिलांची हत्या केली आहे. ही घटना पारू ठाणे क्षेत्रातील जाफरपूर खुटाही गावची आहे. या घटनेने अख्ख गाव हादरले आहे.

Double Murder In Muzaffarpur
आई वडील हत्या मुझफ्फरपूर
author img

By

Published : Mar 26, 2022, 2:18 PM IST

मुजफ्फरपूर (उ.प्र) - जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर ( Son kill mother father in Muzaffarpur ) आली आहे. एका मुलाने त्याच्या आई वडिलांची हत्या केली आहे. ही घटना पारू ठाणे क्षेत्रातील जाफरपूर खुटाही गावची आहे. या घटनेने अख्ख गाव हादरले आहे. आरोपीने आधी त्याच्या आई - वडिलांना मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्यी हत्या केली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लोकांनी आरोपीला घरात कैद केले आहे.

हेही वाचा - भगवान शिव हाजीर हो! समन्स मिळाल्याने भगवान शिव कोर्टात हजर, सुनावणीची तारीख पुढे ढकलली

जीव वाचवून पळाली ज्योती : मिळालेल्या माहितीनुसार, अजय साहनी याने आपले वडील शंभू साहनी आणि आईची निर्घून हत्या केली. अजय हा आपल्या बहिणीलाही मारणार होता, मात्र ती जीव वाचवून घरातून पळाली. ज्योती घरातून बाहेर पडताच आवाज करू लागली. ज्योतीने आरडाओरडा केल्याने घराबाहेर ग्रामस्थांची गर्दी झाली. ग्रामस्थांनी घराला बाहेरून कुलूप लावून पोलिसांना माहिती दिली.

आरोपी अजय साहनी हा मानसिक रुग्ण : आरोपी अजय साहनी हा मानसिक रुग्ण असल्याचे लोकं सांगतात. याआधीही तो वेगवेगळ्या हालचाली करत असे. पण, तो एवढं भयंकर पाऊल उचलेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पारू पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, एका मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. पोलीस पथक ताफ्यासह घटनास्थळी रवाना झाले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

हेही वाचा - बापाने लेकीच्या मृतदेहाला 10 कि.मी खांद्यावर नेले; छत्तीसगडच्या आरोग्य मंत्र्याकडून चौकशीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.