ETV Bharat / bharat

FM Nirmala Sitharaman: वाढती अर्थव्यवस्था काही लोकांना पाहवत नाही; अर्थमंत्री सीतारामन यांची टीका - काँग्रेसचे खासदार ए रेवंत रेड्डी

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज त्याचा चौथा दिवस आहे. दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन जरा तापल्या. (FM Nirmala Sitharaman) तेलंगणातील काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पंतप्रधान मोदींच्या जुन्या विधानाचा हवाला देत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की काही लोकांचा देशाची मजबूत अर्थव्यवस्था पाहवत नाही.

FM Nirmala Sitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
author img

By

Published : Dec 12, 2022, 3:48 PM IST

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवार (दि. 12 डिसेंबर)रोजी लोकसभेत विरोधकांवर घणाघात केला. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे तेव्हा त्यावर सतत टीका करू नये. तर त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. 2014 पूर्वी केवळ रुपयाच वाईट स्थितीत नव्हता तर पुर्ण संपूर्ण अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत होती असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार ए. रेवंत रेड्डी यांनी पुरवणी प्रश्न विचारताना डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या विधानाचा हवाला देत आज रुपया ८३ च्या पुढे गेला आहे, मग सरकार त्याला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सीतारामन बोलत होत्या. "पंतप्रधान (गुजरातचे) मुख्यमंत्री असताना त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सदस्यांनी त्या काळातील (२०१४ पूर्वी) अर्थव्यवस्थेचे इतर संकेतक लक्षात आणून दिले असते तर बरे झाले असते. त्यावेळी संपूर्ण अर्थव्यवस्थाच धोक्यात होती. तसेच, त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पाच सर्वात कमकुवत ज्या अर्थव्यवस्था आहेत त्यामध्ये समाविष्ट होती असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

रुपयाची किंमत 83.20 - तेलंगणातील काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे एक जुन्या विधानाचा यावेळी लहावा दिला. ज्यामध्ये 'रुपया आयसीयूमध्ये पडून आहे, हे देशाचे दुर्दैव आहे की मोदी सरकारला देशाची काळजी नाही. तसेच, आज सरकारला आपली खुर्ची वाचवण्याची चिंता लागली आहे. रुपया पडण्याची चिंता नाही, कृती आराखडा नाही. जेव्हा डॉलरची किंमत 66 रुपये होती, तेव्हा ते म्हणाले की रुपया वाईट स्थितीत आहे. आता रुपयाची किंमत 83.20 आहे. 83.20 असेल तर याचा अर्थ आपण थेट शवागारात जात आहोत. यावर त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना शवागारातून पैसे परत आणण्यासाठी काही कृती योजना आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर अर्थमंत्री म्हणाल्या 'पंतप्रधान मुख्यमंत्री असताना त्या काळातील विधान पुढे करून हे प्रश्न विचारत आहेत, ते अगदी योग्य आहे. हा प्रश्न विचारला पाहिजे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, 'कोणाला काय विचारायचे आणि काय नाही हे मी ठरवेन. निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, रेड्डी यांनी अवतरणासह त्या काळातील इतर सर्व संकेतकांची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.

मोदी सरकारने देश उद्ध्वस्त केला - अनुमुला रेवंत रेड्डी यांनी पुरवणी प्रश्न विचारला त्यामध्ये '1947 ते 65 वर्षांपर्यंत सरकारांनी 55,87,149 कोटींचे कर्ज घेतले होते. पण नरेंद्र मोदी सरकारने आपल्या सरकारमध्ये आतापर्यंत 18,00,744 कोटींचे कर्ज घेतले आहे. दरवर्षी 10 हजार कोटी कर्ज मागून जगतोय, या सरकारने हा देश उद्ध्वस्त केला आहे असा घणाघात रेड्डी यांनी केला आहे. रुपया मजबूत करायचा असेल तर परदेशी गुंतवणूकदारांना पाहावे लागेल, यात तुमचा कृती योजना काय आहे?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. प्रत्येक चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आहे' याला उत्तर देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, चलनाचे अवमूल्यन हा शब्द स्थिर विनिमय दर यंत्रणा असताना वापरला जातो. आज भारतात कोणतीही स्थिर विनिमय दर यंत्रणा नाही. जर दर कमी असेल तर आपण डिप्रेसिएशन आणि एप्रीसिएशन याबद्दल बोलतो. अवमूल्यन त्यात येत नाही, अस त्यांनी यावर आपले मत मांडले आहे.

मीम्सचाही संदर्भ - कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धानंतरही आज आपली अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जर आपली अर्थव्यवस्था चांगली काम करत असेल, पुढे जात असेल, तर त्याचा लोकांना हेवा वाटयला हवा. तसेच, त्याचा अभिमान बाळगायला हवा. अर्थव्यवस्था चांगली काम करत आहे. त्याची चेष्टा करू नका असही सीतारामन म्हणाल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 'कांदे न खाणे' या त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्याचा आणि 'डॉलर मजबूत होण्याबाबत' त्यांच्या विधानावर सोशल मीडियावर तयार होत असलेल्या मीम्सचाही संदर्भ देत म्हणाले, "भारताचा रुपया प्रत्येक चलनाच्या तुलनेत मजबूत आहे. यूएस फेड डॉलर आहे. रिझर्व्हच्या धोरणांमुळे मजबूत होत आहे असाही दावा त्यांनी यावेळी केला आहे.

परकीय थेट गुंतवणूक - रुपया कमकुवत असताना काही परकीय चलनाचा साठा वापरण्यात आला होता. आता काही उपयोग नाही. आता परकीय चलनाचा साठा वाढत आहे. एफडीआय आणि एफआयआयच्या आगमनाने तो वाढत आहे. सीतारामन म्हणाल्या की, अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारत किती जास्त एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) आणत आहे याची आकडेवारी सदस्यांनी पाहिली पाहिजे असही त्या म्हणाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.