ETV Bharat / bharat

पाक लष्कराच्या गोळीबारात आसामधील जवानाला वीरमरण - पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन

चंद्रा रॉय २००१ साली लष्करात भरती झाले होते. ते ५९ फिल्ड आर्टिलरी विभागात ते कर्तव्यावर होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे.

चंद्रा रॉय
चंद्रा रॉय
author img

By

Published : Nov 14, 2020, 7:35 PM IST

धुबरी (आसाम) - पाकिस्तानी लष्कराने काल (शुक्रवार) जम्मू काश्मीरमधील उरी आणि गुरेज सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. यात महाराष्ट्रातील दोन आणि आसाम, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे. आसाममधील चंद्रा रॉय (४८) या जवानाला वीरमरण आले. सोबतच स्थानिक नागरिकांचाही या गोळीबारात मृत्यू झाला.

२००१ साली लष्करात भरती

चंद्रा रॉय
चंद्रा रॉय

चंद्रा रॉय २००१ साली लष्करात भरती झाले होते. ते ५९ फिल्ड आर्टिलरी विभागात कर्तव्यावर होते. शत्रुशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह मूळ गावी आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

चंद्रा यांच्यासोबत पश्चिम बंगाल राज्यातील सुबोध घोष हा २४ वर्षीय जवान शहीद झाला आहे. सुबोध चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली. तर महाराष्ट्रातील नागपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानही शहीद झाले आहेत. कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले आहे. तर नागपूरमधील काटोल येथील भूषण सतई या जवानाला वीरमरण आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.