रायपूर - आजचा दिवस (10जून) म्हणजे गुरुवार एकाच वेळी अनेक चांगले योग आणि शुभ गोष्टी घेऊन आला आहे. रोहिणी व्रत, वट सावित्री व्रत, अमावस्या, शनि जयंती हे सर्व आज एकाच दिवशी होत आहे. तसेच 2021 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील आजच आहे.
वट सावित्री पूजा-
उत्तर भारतात साजरी केले जाणारे वट सावित्रीचे व्रतही आजच्याच दिवशी आहे. सुहासिनी महिला हिंदू पंरपरेनुसार आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. याच आमावस्येला वडाच्या झाडाची पूजा करून त्याला फेरे घेऊन वट सावित्री व्रत कथा ऐकतात आणि नवऱ्याच्या दिर्घायुष्याचे वरदान मागतात. असे म्हटले जाते की वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचा वास असतो. हिंदू कालमापनाच्या माहितीनुसार वट सावित्री व्रत हे ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरे केले जाते. याच दिवशी सावित्रीने आपल्या नवरा सत्यवानाचा जीव यमाकडून माघारी आणला होता, अशी पुराण कथा सांगितली जाते. त्यामुळे आजचा हा दिवस अधिकच महत्वाचा आहे.
या मंत्रांचा करा जप
वट सावित्री व्रताच्या दिवशी मंगल ग्रह पौष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या दिवशी भगवान शंकराला जलाभिषेक, रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक करणे शुभ मानले जाते. वट सावित्री व्रताच्या दिवशी शिवचालीसाचे वाचन करणे, महामृत्युंजय मंत्राचे पठण करणे, याशिवाय शिव पंचाक्षरी मंत्र (ॐ नम: शिवाय) चा जाप करणे महत्वाचे समजले जाते. सोम प्रदोष या दिवसांपासून वट वृक्षाची परिक्रमा केली जाते. वट वृक्षाला फेरे घातल्याने आणि पूजा केल्याने सर्व ईच्छा पूर्ण होतात.
शनि जयंती होणार साजरी-
हिंदू पंचांगानुसार प्रतिवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरी केली जाते. याच दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. शनिदेवाच्या पूजेने साऱ्या समस्या दूर होतात, असेही म्हटले जाते.
आज आहे सूर्यग्रहण-
2021 या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण आज होणार आहे. शनि जयंती दिवशी सूर्य ग्रहण हा योग तब्बल 148 वर्षानंतर आला आहे. शनि जयंतीच्या दिवशी शनि आणि सूर्य हा एक अद्भुत योग असेल असेही शास्त्राने सांगितले आहे. भारतात हे सूर्यग्रहण अल्पशा स्वरुपात आणि मोजक्याच ठिकाणावरून दिसणार आहे. त्यामुळे देशात ग्रहणाचे वेध काळातील सूतक भारतात पाळले जाणार नाही. तसे तर धार्मिक दृष्टीने लोक ग्रहणाला शुभ मानत नाहीत. मात्र, ग्रहण पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण
भारतीय वेळेनुसार आज 11:42 वाजता ग्रहणाला सुरुवात होईल. दुपारी 3:30 वाजता ग्रहणाचा मध्य सुरू होईल. तर 4:52 मिनिटांनी हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपात पाहायला मिळेल. हे ग्रहण सायंकाळी ६.४१ वाजता समाप्त होणार आहे.