ETV Bharat / bharat

Goa Election: उत्पल पर्रिकरांना सर्वानी पाठिंबा द्यायचे दर्शविल्याने भाजपची अडचण - राऊत - Utpal Parrikar

भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (The late BJP leader Manohar Parrikar) यांचे पूत्र उत्पल पर्रिकर यांना गोवा विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले तर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यायचे दर्शविल्याने भाजपची अडचण (BJP's difficulty in showing support) झाली आहे, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत
author img

By

Published : Jan 18, 2022, 11:26 AM IST

Updated : Jan 18, 2022, 12:15 PM IST

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Shiv Sena MP Sanjay Raut) उत्पल पर्रिकर यांना भाजपला उमेदवारी द्यावीच लागेल असे सांगत त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही असे म्हटले आहे. जातीचे राजकारण सुरू आहे भाजपच ढोंग सुरू आहे असे सांगत आम्ही उत्पल पर्रीकर याला पाठिंबा देण्याचं दर्शविल्यानंतर भाजपची अडचण झाली (BJP's difficulty in showing support) आहे. उत्पल अपक्ष लढल्यास पाठींबा देणार असेही म्हटले आहे. त्याच बरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाचा भाजपकडून अपमान होत आहे. उद्या आम्ही गोव्यात जाऊन आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू असेही राऊत म्हणाले.जर अखिलेश यादव यांना फायदा होत असेल तर ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश मध्ये जाऊन वर्च्युअल रॅली करायला हवी असेही राऊत म्हणाले.

पर्रीकरसाठी राऊतांची उठाठेव कशाला - चंद्रकांत पाटील
गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकीट द्यावे, यासाठी संजय राऊत उठाठेव कशाला करत आहेत. त्यांचं कोणी ऐकणार आहे का? संजय राऊत यांच्यात इतकीच हिंमत असेल तर त्यांनी गोव्यातील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी. राऊत यांना मनोहर पर्रिकर यांच्या मुलाबद्दल बरंच प्रेम आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचे की नाही, याबद्दल भाजपने अजून निर्णय घेतलेला नाही. पण उद्या भाजपने पर्रिकर यांच्या मुलाला तिकीट दिले तर सर्व विरोधी पक्ष त्या मतदारसंघातून लढणार नाहीत आणि ही निवडणूक बिनविरोध कराल का? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. यासाठी तुम्ही तयार आहात का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही प्रयत्न केले गेले!
यापूर्वीही संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते. उत्पल पर्रिकर यांच्या वडिलांनी भाजपला गोव्यात एक स्थान निर्माण करुन दिले आहे. गोव्यात भाजप रुजवली आहे. त्यांच्याच प्रतिमेवर गोव्यात भाजप टिकला आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे. शेवटी राजकारणात धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. जर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवेसेनेबरोबर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना नक्कीच त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते

हेही वाचा : Sanjay Raut on BJP: संजय राऊत म्हणाले... 'सगळीच येड्यांची जत्रा, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो'.

Last Updated : Jan 18, 2022, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.