समस्तीपूर: बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो . येथे सापांचा मेळा देखील भरतो ( Snake fair on nag panchami ). नागपंचमीच्या दिवशी भगत हे विषारी सापांचे विष तंत्र-मंत्राने काढून टाकतात, असा स्थानिकांचा दावा आहे. पूजा केल्यानंतर या सापांना पुन्हा पाण्यात सोडले जाते. या सापांसोबत लहान-मोठा प्रत्येकजण खेळण्यासारखा खेळतो. या दरम्यान नदीकाठावरील सर्व लोक सापांना दूध पाजून त्यांची पूजा करतात.
मंत्राच्या शक्तीने निर्माण होतो साप : नागपंचमीच्या दिवशी समस्तीपूरपासून २३ किमी अंतरावर असलेल्या सिंधिया घाटावर ही अनोखी जत्रा भरते. लहान मुले, म्हातारे, प्रत्येकाच्या हातात, गळ्यात साप असतो. जत्रेत कुणी सापाला चारा घालताना तर कुणी सापाशी खेळताना दिसतील. नागपंचमीच्या दिवशी लोक नागाची पूजा करतात. स्थानिक लोक नदीत डुबकी मारून विषारी साप बाहेर काढतात आणि लोकांच्या हवाली करतात. एखाद्याला साप चावला तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो, पण नागपंचमीच्या दिवशी साप कोणालाही चावत नाही, कारण हा साप मंत्रशक्तीने निर्माण झाला आहे. असा दावा भगत यांचा आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लांबून लोक येतात.
श्रावण महिन्याच्या पंचमीला जत्रा भरते - नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा आणि कालसर्प योगापासून मुक्तीसाठी विशेष विधी केले जातात. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येथे विषारी सापांची जत्रा मोठ्या थाटामाटात भरते. सिंधिया घाटाची ही जत्रा तीनशेहून अधिक वर्षांपासून अखंड सुरू आहे. नागपंचमीच्या दिवशी साप पकडण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. असे मानले जाते की अनेक वर्षांपूर्वी ऋषी नाग बनवून कुशाची पूजा करत असत. पण आता लोक खऱ्या सापांना धरून पूजा करतात.