देवनहल्ली (बंगळुरू ग्रामीण) : विमानाच्या टॉयलेटमध्ये एका तरुणीने सिगारेट ओढून, चिंतेचे वातावरण निर्माण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 5 मार्च रोजी रात्री 9.50 वाजता कोलकाताहून बेंगळुरूला येणाऱ्या फ्लाइटमध्ये घडली आणि उशिरा उघडकीस आली. इंडिगो फ्लाइट 6E716 मध्ये एक घटना घडली, या संदर्भात पश्चिम बंगालमधील एका तरुणीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
डस्ट बिनमध्ये आढळले सिगारेटचे तुकडे : इंडिगोचे विमान बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अर्धा तास आधी विमानाच्या टॉयलेट रूममध्ये एका तरुणीने सिगारेट ओढली. शौचालयाचा दरवाजा उघडून तपासणी केली असता; तेथील डस्टबिनमध्ये सिगारेटचा तुकडा आढळून आला. फ्लाइट क्रूला सिगारेट दिसताच, त्यांनी जळत्या सिगारेटवर पाणी ओतले. विमान बंगळुरूमध्ये उतरताच आरोपी तरुणीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
अशी घडली घटना : एअरलाइनकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट 6E716 मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच या संदर्भात पश्चिम बंगालमधील एका तरुणीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. इंडिगोचे विमान बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या अर्धा तास आधी विमानात बसलेली एक मुलगी टॉयलेटमध्ये गेली आणि तिथे धूम्रपान करू लागली. जेव्हा ती टॉयलेटमधून बाहेर आली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सिगारेटचा वास आला, त्यानंतर टॉयलेटची तपासणी करण्यात आली. येथे विमानातील कर्मचाऱ्यांना डस्टबिनमध्ये सिगारेटचा तुकडा सापडला. उड्डाण कर्मचाऱ्याला डस्टबिनमध्ये सिगारेट दिसताच त्यांनी तत्काळ डस्टबिनमध्ये पाणी ओतून पेटलेली सिगारेट विझवली. विमान बेंगळुरूत उतरताच आरोपी महिलेला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले : इतरांचा जीव आणि वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या गुन्ह्याखाली तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून; केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानात असल्या प्रकारच्या वस्तु आणि ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई आहे, आणि असे केल्यास तो कायद्यानव्ये गुन्हा ठरतो. तरी देखील तरुणीने केलेले हे कृत्य अनेकांच्या जीवावर बेतू शकत होते. विमानतळावर अशा प्रकारचे ज्वालाग्राही पदार्थ विमानात घेऊन चढता येत नाही. त्यामुळे सिगारेट आणि ती पेटवण्यासाठी लायटर तिच्याकडून विमानात गेलाच कसा हा आता संशोधनाचा भाग आहे.
Indian Navy Helicopter Crashed: भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले, कुठलीही जीवितहानी नासल्याची बातमी