ETV Bharat / bharat

Smart Helmet : काय सांगता! हेल्मेट घातल्याशिवाय बाईक चालूच होणार नाही...फिचर्स वाचून व्हाल थक्क

Smart Helmet : बिहारमधील काही तरुणांनी मिळून एक असं हेल्मेट बनवलं आहे जे घातल्याशिवाय तुमची बाइक सुरूच होणार नाही. तसेच या हेल्मेटला कितीही ठोकलं तरी ते तुटणार नाही. जाणून घ्या हे हेल्मेट कसं काम करतं आणि त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील. (bike not start without wearing helmet)

Smart Helmet
स्मार्ट हेल्मेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 4:46 PM IST

पहा व्हिडिओ

पाटणा Smart Helmet : आपल्या देशातील अनेक दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय बाईक चालवतात. अशावेळी अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय भारतात बाईक चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडतात. या दोन्ही समस्यावर बिहारच्या तरुणांनी एक अनोखा उपाय शोधून काढलाय. या तरुणांनी असं हेल्मेट बनवलं आहे, त्याच्याशिवाय बाइक सुरूच होत नाही!

  • दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर स्मार्ट हेल्मेट बनवलं : बिहारचे चार तरुण, आर केसरी, यश केसरी, प्रिया आणि रोशनी भारती यांनी हे हेल्मेट बनवलं आहे. या चौघांच्या टीमनं दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर हे स्मार्ट हेल्मेट बनवलं. ईटीव्ही भारतशी बोलताना आर केसरी यांनी सांगितलं की, या हेल्मेटचं वैशिष्ट्य म्हणजे जर कोणी हेल्मेट वापरत असेल तर त्यानं हेल्मेट घातल्याशिवाय त्याची बाइक सुरू होणार नाही.

बाईकच्या चावीसोबत हे हेल्मेट असणंही खूप गरजेचं आहे. डोक्यावरून हेल्मेट काढताच गाडी थांबते. अनेक वेळा असं पाहायला मिळतं की, लोकं हेल्मेट घालत नाहीत आणि मग अपघाताचे बळी पडतात. अशा परिस्थितीत हे हेल्मेट अतिशय प्रभावी आहे. - आर केसरी, स्मार्ट हेल्मेट निर्माता

हेल्मेटला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळालं आहे : यश केसरी यांनी सांगितलं की, हे हेल्मेट बाईक चोरी रोखण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. 'माझं हेल्मेट अगदी सामान्य हेल्मेटसारखे दिसत असलं तरी ते सामान्य नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी हेल्मेट रस्त्यावर फेकून त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, तेव्हा हेल्मेटवर एक ओरखडाही नव्हता. या हेल्मेटला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळालं आहे. या हेल्मेटमध्ये एक डिव्हाईस बसवण्यात आलं आहे, तर एक डिव्हाईस बाईकमध्ये बसवलंय. ज्या बाईकमध्ये हे डिव्हाईस बसवलं आहे ते हेल्मेटशी मॅच केलंय.

  • हेल्मेटचे फिचर्स : हेल्मेटमध्ये बसवलेलं हे उपकरण चार्ज करता येतं. एका दिवसाचं चार्जिंग तब्बल १० दिवस बॅकअप देतं. यासोबतच बॅटरी किती टक्के चार्ज झाली हे सांगणारं इंडिकेटरही बसवण्यात आलं आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये ऑटो कट देखील बसवण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही रात्री चार्जिंग सुरू केल्यास ते चार्जिंगनंतर आपोआप बंद होतं.

हेल्मेटशिवाय बाईक का सुरू होत नाही : मजबूत असण्यासोबतच स्मार्ट असणं ही या हेल्मेटची खासियत आहे. हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही तुमची बाइक सुरू करू शकत नाही. यात दोन मोड आहेत, ऑटोमॅटिक मोड आणि नॉर्मल मोड. नॉर्मल मोडमध्ये तुम्ही ते सामान्य हेल्मेटप्रमाणे वापरू शकता. तर ऑटोमॅटिक मोडमध्ये, तुम्हाला बाईक सुरू करण्यासाठी हेल्मेट घालावं लागेल. त्यानंतरच बाईक सुरू होईल.

या स्मार्ट हेल्मेटच्या सहाय्याने अनेक प्रकारचे प्रयोग करता येतात. यापूर्वी आम्ही यंत्रामध्ये ट्रिपल मोड देखील ठेवला होता. म्हणजेच जर बाईकवर तिघं जणं बसले तर बाइक सुरू होणार नाही, अशी सिस्टम त्यात होती. ट्रिपल सीट बाइक चालवणं वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. परंतु काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत ट्रिपल सीट जावं लांगत. हे लक्षात घेऊन आम्ही हा मोड काढून टाकला. - आर केसरी, स्मार्ट हेल्मेट निर्माता.

पाटण्यात ३०० हून अधिक हेल्मेटची मागणी : टेकवर्ड कंपनीचे आर के केसरी यांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी हेल्मेटची विक्री सुरू करण्यात आली. आता त्याची मागणी वाढली आहे. आम्ही ११ प्रकारची हेल्मेट तयार केली असून, स्कूटर, बाईक आणि बुलेटसाठी वेगवेगळी हेल्मेट आहेत. या हेल्मटची किंमत १४०० ते १८०० रुपयांपर्यंत आहे. बाईकमध्ये हेल्मेटसोबतच डिव्हाईस बसवण्यात आलं असून त्याची ६ महिन्यांची गॅरंटी आहे. दोन दिवसांत एकट्या पाटण्यातून ३०० हून अधिक हेल्मेटची मागणी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Special Story : टाकाऊ वस्तूंपासून बनवले 'थ्री इन वन' इंडिकेटर, खर्च केवळ 70 रुपये!, वाचा स्पेशल स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.