मुबंई - सध्या लग्नसराई असल्याने रोज सोन्याच्या भावात वाढ होत आहे. रोज वाढ होत असल्याने सोने खरेदी करणारा वर्ग कहीसा चिंतेत आहे. दरम्यान, आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक दिवस आहे. ( Gold-Silver Prices Today ) कारण आज देशातील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरला असून तो 49,300 रुपयांवरून 49,000 रुपयांवर आला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 330 रुपयांनी घसरून 53,450 रुपयांवर आली आहे.
सोन्या-चांदीच्या किमती बदलतात - दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅमचे 22 कॅरेट सोने 49,000 रुपयांना आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार चेन्नई सारख्या दक्षिणेकडील शहरांमध्ये सोन्याच्या भावात वाढ होती. तिथे सोने 49,450 रुपयांवर होते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर करांमुळे देशभरात सोन्या-चांदीच्या किमती बदलतात.
जाणून घ्या तुमच्या शहरातील २४ कॅरेट सोन्याच्या किमती-
- पुणे - 53,500
- बंगलोर - 53,450
- जयपूर - 53,600
- नागपूर - 53,500
- पाटणा - 53,500
- अहमदाबाद - 49,530
- लखनौ - 53,600 रु
- म्हैसूर - 53,450
हेही वाचा - Ursula Von Der Leyen : युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांचे भारतात आगमन