ETV Bharat / bharat

Boy Dies Due to Falls Into Borewell : बोअरवेलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, आठ तासाचे बचावकार्य व्यर्थ

author img

By

Published : May 22, 2022, 7:11 PM IST

Updated : May 22, 2022, 10:36 PM IST

होशियारपूरमधील गढडीवालाजवळील बहरामपूरमध्ये रविवारी (दि. 22 मे) सहा वर्षांचा मुलगा 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. तो शंभर फुटावर अटकला होता. सुमारे आठ तास बचावकार्य राबवत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

होशियारपूर (पंजाब) - होशियारपूरमधील गढडीवालाजवळील बहरामपूरमध्ये रविवारी (दि. 22 मे) सहा वर्षांचा मुलगा 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. तो शंभर फुटावर अटकला होता. सुमारे आठ तास बचावकार्य राबवत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. हृतिक रोशन, असे त्या चिमुकल्याचे नाव आहे.

बोअरवेलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू

हृतिक हा खेळत असताना सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास काही भटक्या श्वानांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तेव्हा तो धावत बोअरवेलच्या शाफ्टवर चढला. बोअरवेलचा शाफ्ट बारदाणने झाकलेला होता. हृतिक त्यावर चढताच तो बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त संदीप हंस यांसह जिल्हा प्रशासनाचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ( NDRF ) पथकालाही पाचारण करण्यात आले. तसेच वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले. मुलाच्या प्रकृतीवर व हलचालींवर नजर ठेवण्यासाठी बोअरवेलच्या आत कॅमेरा लावण्यात आला होता. खड्ड्यात ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याने त्याला कृत्रीम ऑक्सिजन पुरवला जात होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला मृत घोषित केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हणाले, "हृतिकला आमच्याकडे आणले तेव्हा त्याचे शरीर ताठरले होते. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. त्याच्या शरीराचे तापमान पाहता, त्याला वाचवण्यापूर्वी शेवटच्या अर्ध्यातापासूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा", असा अंदाजही डॉक्टरांनी वर्तवला आहे. प्राथमिक तपासानुसार मुलाचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष कुमार यांनी दिली.

हेही वाचा - पियाली बसाक ठरली ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करणारी भारताची पहिली महिला गिर्यारोहक

Last Updated : May 22, 2022, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.