ETV Bharat / bharat

सहा वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या; राजस्थानातील संतापजनक प्रकार - राजस्थान बलात्कार बातमी

गुरुवारी खेळायला म्हणून घराबाहेर गेलेली ही चिमुरडी कितीतरी वेळ झाला तरी परतलीच नाही. त्यामुळे तिचे नातेवाईक आणि शेजारी तिचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना एका पडक्या घरामध्ये तिचा मृतदेह आढळून आला...

Six year old girl raped and then murdered in Karauli
सहा वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या; राजस्थानातील संतापजनक प्रकार
author img

By

Published : May 7, 2021, 7:23 AM IST

जयपूर : राजस्थानच्या हिंडौन जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील करौलीमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संतापजन प्रकार समोर आला आहे. ही चिमुरडी गुरुवारपासून बेपत्ता होती. तिचा शोध घेतला असता एका पडक्या घरामध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी हा मृतदेह हिंडौन जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रथमदर्शनी या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी झाली होती बेपत्ता..

गुरुवारी खेळायला म्हणून घराबाहेर गेलेली ही चिमुरडी कितीतरी वेळ झाला तरी परतलीच नाही. त्यामुळे तिचे नातेवाईक आणि शेजारी तिचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना एका पडक्या घरामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवले असता, जिल्हा पोलीस अधीक्षक मृदूल कच्छवा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक किशोरी लाल हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गांभीर्याने तपास सुरू..

ही अत्यंत संतापजनक घटना असून, आम्ही गांभीर्याने याचा तपास करत आहोत. एफएसएल पथकाने घटनास्थळावरुन बरेच पुरावे गोळा केले आहेत. आम्ही लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन, त्याला कडक शिक्षा देऊ असे किशोरी लाल यांनी सांगितले.

हेही वाचा : छत्तीसगड : अतिप्रमाणात अल्कोहल मिश्रित औषध पिल्याने ८ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.