सिद्धार्थनगर - उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये सोमवारी एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - पीएची हत्या केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; ओडिशामधील प्रकार
पोलीस अधीक्षक राम अभिलाष त्रिपाठी यांनी सांगितले की, सिद्धार्थनगरमधील मधुबेनिया गावाजवळ एका कार रस्त्यावरून खाली घसरली आणि पलटी झाली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोरखपूर येथे पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
त्रिपाठी म्हणाले की, कपिलवस्तु कोतवाली परिसरातील रक्सेल येथे राहणारे हे लोक होते. ते मुंडन संस्कार करण्यासाठी घरातून बिहारमधील मैरवाला जाण्यासाठी निघाले होते. तो बढया गावाजवळ आले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याने हा अपघात झाला. वाहनचालक मुनील याच्या भावाने सांगितले की, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - दिवाळीनंतर दुसर्या दिवशी चित्रकूटमध्ये भरतो गाढवांचा बाजार