ETV Bharat / bharat

Singapore Open Super 500 : सिंधूने जपानच्या कावाकामीला हरवून गाठली अंतिम फेरी

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने 32 मिनिटांच्या उपांत्य फेरीत 21-15, 21-7 असा विजय मिळवला. सायना कावाकामीविरुद्ध सिंधूचा विक्रम आता 2-0 ( Sindhu record against Saina Kawakami 2-0 ) असा झाला आहे.

author img

By

Published : Jul 16, 2022, 3:38 PM IST

Sindhu
Sindhu

सिंगापूर: दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जपानी खेळाडू सायना कावाकामीचा पराभव केला ( PV Sindhu defeated Saina Kawakami ) आहे. त्याचबरोबर तिने सिंगापूर ओपन सुपर 500 ( Singapore Open Super 500 ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूने उपांत्य फेरीतील 32 मिनिटांच्या सामन्यात 21-15, 21-7 असा विजय मिळवला.

सायना कावाकामीविरुद्ध सिंधूचा विक्रम आता 2-0 असा झाला ( Sindhu record against Saina Kawakami 2-0 ) आहे. यापूर्वी दोघेही चायना ओपन 2018 मध्ये आमनेसामने आल्या होत्या. पीव्ही सिंधू सातत्याने उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपननंतर तिने प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ( PV Sindhu Reach Singapore Open Final ) आहे. सिंधूने स्विस विजेतेपदावर कब्जा केला होता.

विजेतेपदाच्या लढतीत पीव्ही सिंधूचा थेट सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. आता बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी ती जेतेपद पटकावते का हे पाहायचे आहे. याआधी उपांत्य फेरीत सिंधूने शुक्रवारी सेट गमावल्यानंतर 17-21, 21-11, 21-19 असा विजय मिळवला. सिंधूने आता या चिनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 3-0 असा विक्रम केला आहे. दुसरीकडे जपानच्या सायना कावाकामीने सहाव्या मानांकित थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा 21-17, 21-19 असा पराभव करत मोठा उलट फेर केला.

हेही वाचा - World Athletics Championships : लांब उडीच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीशंकर, ठरला पहिला भारतीय पुरुष खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.