चंदीगड (पंजाब): गायक सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी मंगळवारी पंजाब विधानसभा संकुलाबाहेर धरणे धरले आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही यावेळी संगीतले. सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शुभदीप सिंग सिद्धूची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
काँग्रेसचे नेतेही उपस्थित: मुलाच्या हत्येतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचे त्याचे वडील बलकौर सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. तपास यंत्रणांनी ठोस काहीही केलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. हे प्रकरण पुढे नेल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सिंह आणि त्यांची पत्नी चरण कौर यांनी हातात फलक घेऊन विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांच्यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांच्यासह पंजाब काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित आहेत. गायकाचे वडील म्हणाले, 'आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून आज आम्ही इथे आलो, गेल्या 10 महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. पोलिस आणि प्रशासनाला कारवाईसाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न: ते म्हणाले की, सत्य हे आहे की (हत्येचे) प्रकरण दाबले जात आहे. मुख्य साक्षीदार तपासले गेले नाहीत आणि आमच्या बाजूने काहीही होत नाही. त्यामुळे विधानसभेबाहेर आंदोलन करावे लागले आहे. बलकौर सिंह म्हणाले, जोपर्यंत राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे, तोपर्यंत आम्ही बाहेर आंदोलनावर बसू, असा निषेध व्यक्त केला.
गुन्हेगार पकडले जातील: दरम्यान, पंजाबचे मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी विधानसभेच्या बाहेर मुसेवाला यांच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले की आम आदमी पार्टी (आप) सरकार त्यांच्यासोबत आहे. त्यांनी मुसेवाला यांच्या वडिलांना सांगितले, 'हे तुमचे सरकार आहे, तुम्हाला कोणत्याही धरणावर बसण्याची गरज नाही. आम्ही तुमची लढाई लढू. मुख्य सूत्रधारासह सर्व गुन्हेगार पकडले जातील, असे ते म्हणाले.
हेही वाचा: Elephants Died in TN: तामिळनाडूमध्ये विजेरी कुंपणाला चिटकून तीन हत्तींचा मृत्यू, गुन्हा दाखल.. शेतकऱ्याला अटक