मथुरा - श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादावर आज मथुरा जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनेकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
श्री कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादात काय घडले: मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबत वाद आहे. 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा कोर्टात दाखल करण्यात आली आहे. संपूर्ण जमीन ताब्यात घेऊन श्रीकृष्ण जन्मभूमीच्या बाजूला बांधलेली शाही इदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने वादग्रस्त जागेची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीची मागणीही केली होती. हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. सततच्या विलंबामुळे याचिकाकर्ते मनीष यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मनीषने उच्च न्यायालयातही हीच मागणी केली. यानंतर न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून अहवाल मागवला. या प्रकरणी २९ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मंदिराच्या वतीने कनिष्ठ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जावर चार महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.