ETV Bharat / bharat

इशरत जहां प्रकरणी सीबीआयने तीन पोलीस अधिकाऱ्यांना केले डिस्चार्ज

author img

By

Published : Mar 31, 2021, 1:51 PM IST

Updated : Mar 31, 2021, 3:27 PM IST

अहमदाबादमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने 31 मार्च रोजी इशरत जहान बनावट चकमक प्रकरणातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना डिस्चार्ज केले आहे. सीबीआय कोर्टाने आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी तरुण बरोट आणि उपनिरीक्षक अनुज चौधरी यांच्याविरूद्ध हा निर्णय दिला आहे.

सीबीआयने केली तीन पोलीस अधिकाऱ्यांची सुटका

अहमदाबादमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने 31 मार्च रोजी इशरत जहां बनावट चकमक प्रकरणातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना डिस्चार्ज केले आहे. सीबीआय कोर्टाने आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी तरुण बरोट आणि उपनिरीक्षक अनुज चौधरी यांना डिस्चार्ज केले आहे.

इशरत जहां
इशरत जहां

गेल्या वर्षी फेटाळून लावली याचिका

इशरत जहां बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना डिस्चार्ज करण्याची मागणी सीबीआय न्यायालयाकडे करण्यात आली होती. ती मागणी सीबीआयने फेटाळून लावली. या तीन आरोपींमध्ये भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी जी. एल. सिंघल, पोलीस उपअधीक्षक (निवृत्त) तरुण बारोट आणि उपनिरीक्षक अननू चौधरी यांचा समावेश आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी निवृत्त पोलीस उपअधीक्षक जे. जी. परमार हे होते. त्यांनीही मागणी केली होती. मात्र. त्यांचे निधन झाले. आता न्यायालयाने या तिघांना डिस्चार्ज केले आहे.

काय आहे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरण

मुंबई जवळ मुंब्रा येथे राहणारी इशरत जहाँ ही १९ वर्षीय तरुणी जावेद शेख उर्फ ​​प्रणेश पिल्लई, अमजदाली अकबरली राणा आणि झीशान जोहर यांच्यासह गुजरात पोलीसांसोबत १ जून २००४ ला अहमदाबादजवळ झालेल्या चकमकीत मारली गेली. हे चार अतिरेकी असून त्यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येची योजना आखल्याचा दावा गुजरात पोलीसांनी केला होता. तथापि, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने ही चकमकी बनावट असल्याचा निष्कर्ष काढला. आणि त्यानंतर सीबीआयने विविध पोलिस अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने २० मार्च रोजी कोर्टाला सांगितले की राज्य सरकारने तीनही आरोपींवरील खटला मंजूर करण्यास नकार दिला आहे. 2020 च्या ऑक्टोबरच्या आदेशात कोर्टाने "त्यांची अधिकृत कर्तव्ये पार पाडली आहेत" असे नमूद केले आहे. या कारणामुळे तपास एजन्सीला खटला मंजूर करण्याची आवश्यकता होती. सीबीआयच्या विशेष कोर्टाने बुधवारी इशरत जहांच्या बनावट चकमकी प्रकरणातील पोलिस अधिकारी जी. एल. सिंघल, पोलीस उपअधीक्षक (निवृत्त) तरुण बरोट आणि अनजू चौधरी यांविरुध्द असलेले आरोप मागे घेतले. विशेष सीबीआय न्यायाधीश व्ही. आर. रावळ यांनी सिंघल, बरोट (आता सेवानिवृत्त) आणि उपनिरीक्षक चौधरी यांच्याविरुध्द आरोप मागे घेण्याची परवानगी घेतली.

यापूर्वी वंजारा आणि अमिन यांना केले मुक्त

इशरत जहां बनावट चकमक प्रकरणातील आरोपी माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमिन यांची विशेष सीबीआय न्यायालाने निर्दोष मुक्तता केली होती. गुजरात सरकारकडून दोन्ही अधिकाऱयांविरोधात खटला चालवण्याची परवानगी न मिळाल्यानंतर दोघांनी दोषमुक्त करण्याचे निवेदन दिले होते. गुजरात सरकारने खटला चालवण्याची परनवानगी न दिल्यामुळे दोघांची विनंती मान्य करण्यात येत आहे, असे सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधिश जे. के. पांड्या यांनी निर्वाळा देताना म्हटले होते. भारतीय दंड विधानाची कलम १९७ अतंर्गत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने कर्तव्याबाबत खटला चालवण्यासाठी सरकारची मंजूरी मिळणे आवश्यक असते, असे त्यांनी म्हटले होते. मुंबई येथील रहिवासी इशरत, जावेद शेख, अमजद आली अकबर आणि जीशान जोहर यांच्यासोबत १५ जून २००४ ला अहमदाबाद येथे पोलिसांसोबत चकमक झाली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दावा केला आहे की ते दहशतवादी होते. तसेच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी ते गुजरातला आले होते. त्यावेळी डी. जी. वंजारा हे गुजरातचे उपपोलीस महानिरिक्षक होते. त्यांनी २००७ ते २०१५ पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा भोगली आहे.

कोण होती इशरत जहां

इशरत जहांचा जन्म १९८५ मध्ये झाला होता. १५ जुन २००४ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये तिला ठार मारण्यात आले होते. मुंबईच्या गुरु नानक खालसा कॉलेजची ती विद्यार्थीनी होती. तिला एकूण ७ भावंडे आहेत. तिची कुटुंब मुळचे बिहारचे होते. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. ठाणे जिल्ह्यातील मुस्लिम वस्ती असलेल्या मुब्र्यातील राशिद कम्पाऊंड येथे कुटुबीयांसह ती राहत होती. तिचे वडील महंमद शमिम राजा हे एशियन कन्स्ट्रक्शन या कंपनीचे मालक आहेत. तिची आई वाशितील मेडिसिन पॅकेजिंग कंपनीत काम करत होती. दरम्यान, एन्काऊंटरच्या दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

Last Updated : Mar 31, 2021, 3:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.