ETV Bharat / bharat

Shraddha Walkar murder case : दिल्ली पोलिसांचा आफताबची सायको-असेसमेंट चाचणी घेण्याचा विचार - Aftab psycho assessment test

दिल्ली पोलीस आफताब पूनावाला याच्यावर सायको-असेसमेंट चाचणी घेण्याची ( Aftab psycho assessment test ) योजना आखत आहेत.श्रद्धा वालकरचा गळा दाबून त्याने खून केला होता. दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात तुकडे फेकून दिले होते.

Aftab psycho assessment test
सायको असेसमेंट चाचणी
author img

By

Published : Nov 16, 2022, 2:35 PM IST

Updated : Nov 16, 2022, 4:05 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलीस आफताब पूनावाला याच्यावर सायको-असेसमेंट चाचणी ( Aftab psycho assessment test ) घेण्याची योजना आखत आहेत. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून त्याने खून केला होता. तिचे 35 तुकडे करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. यावर्षी मे महिन्यात दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात तुकडे फेकून दिले होते. दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police ) तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीची चौकशी सुरू केल्यानंतर शनिवारी आफताबला अटक करण्यात आली.

आवश्यक उपाययोजना करणार : जर आफताब मानसिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले तर त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपास झाल्यानंतर येत्या काही दिवसांत चाचणी अपेक्षित आहे. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये सायको-असेसमेंट चाचण्या केल्या ( Shraddha Walkar murder case ) आहेत. गेल्या वर्षी इस्रायल दूतावासात झालेल्या स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार विद्यार्थ्यांची मनोविश्लेषण चाचणी घेण्यात आली होती.

हत्याकांडाचे मुंबई कनेक्शन: श्रद्धा विलास वालकर ही तरुणी वसई येथील संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहत होती. मात्र, घरच्यांनी आफताफसोबत लग्नास विरोध केल्याने ती वाळी व नंतर वसई येथे आफताबसोबत राहू लागली. जानेवारी 2020 मध्ये श्रद्धाच्या आईचे निधन झाले. त्यावेळी निधनानंतरच्या श्राद्धविधीसाठी पंधरा दिवसांनी श्रद्धा आपल्या घरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतर ती पुन्हा आफताफसोबत राहू लागली. दरम्यान, या दोघांमध्ये खटके उडत असत मार्च 2022 मध्ये आफताफ आणि श्रद्धा हे दोघेही दिल्ली येथे गेले. त्यानंतर श्रद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या मुंबईतील वसईतील मित्र- मैत्रिणींच्या संपर्कात होती.मेसेजला रिप्लाय नाही: श्रद्धाच्या एका मित्राने तिला ऑगस्ट महिन्यात मेसेज केल्यानंतर काहीच रिप्लाय न आल्याने त्याने याबाबत श्रद्धाचा भाऊ श्रेयसला कळवले. त्यानंतर श्रेयस आणि श्रद्धाच्या वडिलांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाचाच एक भाग म्हणून माणिकपूर पोलिसांनी आफताबसह त्याच्या आई-वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबरला देखील आफताफला दिल्लीहून मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

आफताबही पोलीस ठाण्यात : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करुन रोज एक- एक अवयव जंगलात फेकले. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दरम्यान तो माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा येऊन गेला होता अशी माहितीही पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.ओळख ते हत्याकांड: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान डेटिंग अ‍ॅपद्वारे मे २०१७मध्ये भेट झाली. 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.

एक फूट लांब सुरीचा वापर : 18 मेला आफताफने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले आणि त्यानंतर मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले आणि त्याप्रमाणे शरीराचे तुकडे तुकडे केले. मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने प्रथम आतड्यांची विल्हेवाट लावली आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. हत्या करण्यासाठी आफताफने एक फूट लांब सुरीचा वापर केला होता.

Last Updated : Nov 16, 2022, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.