श्रीनगर - गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये शोध मोहीम राबवण्यात येत आहे. सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. खोऱ्यातील शोपियानमध्ये जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडर सज्जाद अफगानीला यमसदनी धाडले. शनिवारपासून सुरु झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रविवारी सुरक्षा दलाने जहांगीर अहमदला ठार केले होते.
दहशतवाद्याची ओळख पटली असून सज्जाद अफगाणी असे त्याचे नाव आहे. शोपियानमधील रावालपोरामध्ये रविवारी सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर विलायत उर्फ सज्जाद अफगानीला घेरलं होतं. सुरक्षा दलांनी त्यांना समर्पण करण्याचं अनेकदा आवाहन केलं. मात्र, त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत सुरक्षा दलांनी त्याला कंठस्नान घातलं.
दो दहशतवादी ठार तर एकाला अटक -
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांच्या विरोधात सावधपणे कारवाई केली जात आहे.शनिवारी जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला अटक केली होती. या दहशतवाद्याकडून तीन चीनी पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 15 जिवंत काडतूसे आणि एक सायलेन्सर जप्त केले होते. तसेच 11 मार्चला अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती झाल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. आदिल अहमद भट आणि जाहिद अहमद राठेर असे मृत दहशतवाद्यांचे नाव आहे.
हेही वाचा - देशद्रोह खटला : न्यायालयात हजर कन्हैया अन् उमर खालिद, अन्य सात जणांना जामीन मंजूर, वाचा सविस्तर