भोपाळ - येथील निशातपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ७ वर्षाच्या निष्पाप मुलाला कुत्र्यांनी चावा घेतला. हे प्रकरण मिलिटरी एरियाजवळील सर्व्हंट क्वार्टरचे आहे. येथे प्रीती भामोरे ही महिला तिच्या ७ वर्षाचा मुलगा हृतिकसोबत राहत होती. ती मजूर म्हणून काम करते. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. तिला झोप लागल्यावर तिचा मुलगा सायकल चालवायला गेला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आईला जाग आली तेव्हा तिला जवळचे मूल दिसले नाही. त्यानंतर ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली. तर झुडुपात त्याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला.
परिसरात लोकांमध्ये घबराट : या भागात झाडाझुडपांमध्ये कुत्रे दिसल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांना हुसकावून लावले असता कुत्र्यांनी मुलाचा चावा घेऊन त्याला खाल्ल्याचे दिसले. भोपाळमध्ये हा भीषण प्रकार समोर आल्यानंतर तेथील रहिवाशांना धक्का बसला आहे. यातून प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. भोपाळमध्ये दररोज भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. याआधी बागशेवनिया परिसरातही असाच प्रकार समोर आला होता. तिथे एका लहान मुलीला दिवसाढवळ्या कुत्र्यांनी ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांचा सल्ला कुचकामी : या प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राजधानी भोपाळमध्ये ही अशा प्रकारची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन अतुलकर यांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे. पुढील पुरावे आल्यावर त्यानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. (Shocking incident in Bhopal)