मुंबई - शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत गुजरातमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे अपक्षांसह 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Shiv Sena MLA Admitted In Surat ) होते. त्यांना भेटू दिल्या जात नसल्याचा आरोप कुटुंंबियांनी केला आहे.
त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचा घरच्यांचा आरोप - महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख संतप्त आमदारासह काल रात्री सुरतच्या हॉटेलमध्ये पोहोचले. मात्र, येथे नितीन देशमुख यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास 108 मधून सुरत येथील नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र दुसरीकडे नितीन देशमुख यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याचीही चर्चा आहे. अकोल्याला जाणार असल्याचे सांगून नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
वॉर्ड बॉयला चापट मारल्याचा रुग्णालयाचा आरोप - सुरतच्या हॉस्पिटलमध्ये आमदार नितीश देशमुख यांनी वॉर्ड बॉयला थप्पड मारली असा दावा रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे. आमदार शिंदे यांच्या सोबत असलेले आमदार नितीन देशमुख यांना सुरतमध्ये रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. यावेळी ते हॉटेलमधून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची वादावादी झाली. त्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले यावेळी त्यांना उच्च प्रतीची देण्यात आली नाही. यावेळी त्यांची आणि वॉर्ड बॉय यांची बाचाबाची झाली. त्यात त्यांनी वॉर्ड बॉयला चापट मारल्याचा दावा रुग्णालयाने शासकीय रुग्णालय चौकीत केला आहे.
आमदार देशमुख यांच्या पत्नी व सेनेचे काही पदाधिकारी सुरतकडे रवाना
फोन नाही काहीच नाही आणि मला खूप काळजी वाटते. हे तिथे मंत्र्यांना निघता येत नाही. त्यामुळे मी स्वतः सुरतला निघत आहे. आता सुरतला जाण्यासाठी आणि मला जायचं आहे. सुरतला काही कोणी रोखले तरी मी जाणारच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली आहे. काहीही परिस्थिती झाली तरी मी सुरतला जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या. त्या आणि काही सेनेचे पदाधिकारी हे दुपारी सुरतसाठी रवाना झाले आहेत.
पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेते सोबत बोलणे झाले नसल्याची प्रतिक्रिया - पतीसोबत काहीतरी झाला असल्याची भीती त्यांना वाटत आहे. पतीला भेटणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना भेटणार आहे. आणि त्यांची विचारपूस करणार आहे. त्यांच्यावर दबाव असल्याचेही दिसून येत आहे. तसेच या संदर्भामध्ये पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेते सोबत बोलणे झाले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी दिलेल्या आहेत.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : भाजपाची सत्ता आणि मला उपमुख्यमंत्री पद तरच... - एकनाथ शिंदे