ETV Bharat / bharat

Congress President Polls: शशी थरूर यांचा प्रचाराचा नारळ नागपुरमध्ये फुटणार, सेवाग्रामला देणार भेट

author img

By

Published : Oct 1, 2022, 5:22 PM IST

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खासदार डॉ. शशी थरूर यांनी नामांकन भरले आहे. ते आज शनिवार (1 ऑक्टोबर)रोजी प्रचाराचा नारळ फुटणार आहे. (Congress President Polls) हा प्रचाराचा नारळ नागपुमध्ये फुटणार आहे.

शशी थरूर यांचा प्रचाराचा नारळ नागपुरमध्ये फुटणार

नागपूर - आज संध्याकाळी शशी थरूर यांचे नागपूरला आगमन होणार आहे. त्यानंतर ते उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देणार आहेत, (Shashi Tharoor will start his campaign) त्यानंतर नागपूरला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी ते प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक घेणार आहेत.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होत आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांधी कुटुंबातील कुणीही नसल्याने निवडणूक ओपन टू ऑल अशी होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर अशी थेट लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 8ऑक्टोबर आहे. तर 17 ऑक्टोबरला पदासाठी निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. आता 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी परिवारातील नसलेला अध्यक्ष मिळणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. आता या पदसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात मल्लिकार्जुन खरगे, शशी थरुर आणि के.एन. त्रिपाठी यांचे अर्ज आहेत. या अर्जांची छाननी होणार आहे. छाननीत काही त्रुटी आढळल्या तर नामांकन रद्द होऊ शकते. त्यामुळे खरगे आणि थरुर यांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की, खरगे यांनी 14, थरुर यांनी 5 तर त्रिपाठी यांनी 1 अर्ज दाखल केला आहे. शनिवारी या अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध असलेल्या अर्जाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे. या तिघांपैकी कोणीही पक्षाकडून अधिकृत उमेदवार नाही. ते तिघेही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.