तिरुअनंतपुरम (केरळ): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या विधानावरून केरळमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. थरूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आणखी एक विधान केले. आपण राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत करणार असून, वेळ पडल्यास काँग्रेसकडून मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. शशी थरूर यांनी असे वक्तव्य केल्याने राज्यातील बहुतांश नेते त्यांच्यावर नाराज आहेत. आपण पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसून आता आपले संपूर्ण लक्ष केरळवर असेल, असे थरूर यांनी थेट सांगितले.
तीन- चार वर्षांनी निवडणूक: केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला म्हणाले की, केरळ विधानसभेची पुढील निवडणूक तीन-चार वर्षांनी आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. जर कोणी आधीच कोट शिवून घेतला असेल तर तो कोट त्याने दुकानात ठेवला तर बरे होईल, असे म्हणत त्यांनी थरूर यांना टोमणा लगावला. चेन्निथला हे केरळ काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत.
चालू वर्षात त्यांना पदावर राहू द्या: शशी थरूर म्हणाले की, त्यांनी अलीकडेच मला फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून मी त्यांना भेटलो. थरूर यांच्या विधानावर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केले की, कोणत्याही खासदाराने त्यांच्या उमेदवारीवर विधान करणे योग्य नाही आणि काँग्रेसकडे उमेदवार निवडण्यासाठी स्वतःची संघटनात्मक यंत्रणा आहे, असेही स्पष्ट केले आहे. 2026 पर्यंत ते थांबतील का, असे विचारले असता, थरूर म्हणाले की, त्यांना चालू वर्षात राहू द्या, नंतर 2024, 2025 आणि नंतर 2026 ला ते माझा विचार करू शकतात.
भेटीसाठी वेळ मागितलेली नाही: थरूर यांनी अलीकडेच काही धार्मिक आणि सामुदायिक नेत्यांची बेहत घेतली होती. त्या भेटीबाबत पक्षातून झालेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मी नेहमीच सर्वांशी चांगले संबंध ठेवतो आणि जेव्हा कुणी मला बैठकीसाठी आमंत्रित करते तेव्हा मी नाही म्हणत नाही. ते म्हणाले, 'मी कोणत्याही व्यक्तीसोबत भेटीची वेळ मागितलेली नाही. मी भेटलेल्या समाजाच्या नेत्यांनी मला बोलावले आणि मी त्यांना भेटावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झाला होता पराभव: मध्यंतरी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात शशी थरूर यांना 1072 मते मिळाली. त्याचवेळी 416 मते अवैध ठरली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात एकूण ९३८५ प्रतिनिधींनी मतदान केले होते. तर 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते.
हेही वाचा: शशी थरूर पुन्हा एकदा पडले प्रेमात तिच्यासह पोहोचले थेट ताजमहाल पाहायला