नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या खांद्यावर शरद पवार यांनी जबाबदारी टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड केल्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा असल्याबाबत शरद पवार यांना विचारले. अजित पवार हे नाराज नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडे कामाचा मोठा अनुभव : सुप्रिया सुळे यांना लोकसभेत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे राजस्थान, हरियाणा यासह देशाच्या विविध राज्यात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यासह प्रफुल्ल पटेल यांच्याकडे छत्तीसगडसह महाराष्ट्राच्या इतर भागात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवार नाराज नाहीत : सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळे अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षात डावलण्यात आल्याची चर्चा करण्यात येत आहे. याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकारी समितीच्या वतीने सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार पक्षात नाराज नाहीत. त्यांनी अशाप्रकारची कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीसाठी ही जबाबदारी टाकल्याने पक्षात उत्साह असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Jayant Patil On Ajit Pawar : अजित पवारांवर कोणताही अन्याय नाही; घराणेशाहीला राष्ट्रवादीत थारा नाही - जयंत पाटील
- Chandrashekhar Bawankule on Pawar Threat: सौरभ पिंपळकरने शरद पवारांना धमकी दिलीच नाही- बावनकुळे यांचा दावा
- Sharad Pawar On Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचे टार्गेट लोकसभा निवडणूक 2024, पक्षातील 'या' नेत्यांच्या खांद्यावर टाकली जबाबदारी