मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्षद्वीप प्रशासनाविरोधात पत्र लिहले आहे. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली.
-
I would like to draw Hon'ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I would like to draw Hon'ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021I would like to draw Hon'ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021
लक्षद्वीपच्या नवनियुक्त प्रशासकांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात लक्षद्वीपचे खासदार (लोकसभा) श्री पी. पी. मोहम्मद फैजल यांनी उपस्थित केलेल्या काही गंभीर चिंतेकडे मी पंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छितो, असे टि्वट शरद पवार यांनी केले आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप का?
वास्तविक, लक्षद्वीपमध्ये प्राणी संरक्षण कायदा बनविला जात आहे. यातून गाय व बैल यांच्या हत्येवर बंदी घातली जाणार आहे. तर दुसर्एका कायद्याद्वारे दारूचा व्यवसाय वाढविण्याची योजना आहे. लक्षद्वीप हा बर्याच काळापासून मद्यपान न करणारा प्रदेश आहे आणि इथले बरेच लोक मांसाहारी आहेत. तर या नव्या कायद्यामुळे येथील लोक प्रशासनाविरोधात नाराज आहेत. स्थानिक नेते प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहेत. यात खासदार मोहम्मद फैजल यांचा समावेश आहे.
प्रशासन लोकांच्या खाण्याच्या परंपरा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. नवीन प्रशासक त्यांच्या "मनमानी पद्धतीने" कारभार करत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे लक्षद्वीपांच्या परंपरेलाही ठेस पोहचत आहे, असे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले.
लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा प्रसार -
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. तर दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना जबाबदार धरले जात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कारभारावर लक्षद्वीपचे लोक संतप्त आहेत.
लक्षद्वीपमध्ये 90 टक्के जनता ही मुस्लिम -
दिनेश्वर शर्मा यांच्या निधनानंतर गुजरातचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांची नवीन प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती. लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीपमध्ये 90 टक्के जनता ही मुस्लिम आहे.