बेंगळुरू : काँग्रेसच्या पुढाकाराने बेंगळुरू येथे विरोधी पक्षांची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाले आहेत. सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. मात्र जेष्ठ नेते शरद पवार यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली. शरद पवार आज झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते, मात्र ते उद्या बेंगळुरूला जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी 24 पक्षांचे नेते उपस्थित राहणार : 'सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रीय कल्याणाचा अजेंडा जोपासण्यासाठी समविचारी विरोधी पक्ष एकत्र येऊन काम करतील', असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले. मंगळवारच्या बैठकीला जवळपास 24 पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. 'सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र यावे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्र लढू', असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
'आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीए जिंकेल' : बैठकीनंतर बोलताना सिद्धरामय्या यांनी म्हटले की, 'कर्नाटकमध्ये भाजपचे पतन सुरू झाले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत यूपीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत मोदींनी जिथे जिथे प्रचार केला तिथे काँग्रेस पक्षाचा विजय झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होईल आणि यूपीए जिंकेल', असे ते म्हणाले.
23 जून रोजी पहिली बैठक झाली होती : या आधी 23 जून रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावर पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वपक्षीयांमध्ये झालेल्या चर्चेत कोणताही अर्थपूर्ण निकाल लागला नसल्याचे म्हटले येत आहे. यानंतर काँग्रेसने ही दुसरी बैठक बोलावली आहे. आता सर्वांच्या नजरा या बैठकीतून काय निष्पन्न होईल याकडे लागल्या आहेत.
-
Opposition leaders' dinner meeting gets underway in Karnataka's Bengaluru pic.twitter.com/HENPkecg1g
— ANI (@ANI) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Opposition leaders' dinner meeting gets underway in Karnataka's Bengaluru pic.twitter.com/HENPkecg1g
— ANI (@ANI) July 17, 2023Opposition leaders' dinner meeting gets underway in Karnataka's Bengaluru pic.twitter.com/HENPkecg1g
— ANI (@ANI) July 17, 2023
हेही वाचा :