नरसिंगपूर : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती (Swami Swaroopanand Saraswati) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. नरसिंगपूर जिल्ह्यातील परमहंसी झोतेश्वर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांना समाधी (TODAY SAMADHI AT PARAMHANSI GANGA ASHRAM) देण्यात येणार आहे. ते नरसिंगपूर जिल्ह्यातीलच आश्रमात राहत होते. द्वारकेच्या शारदा पीठाचे शंकराचार्य आणि ज्योतिमठ बद्रीनाथ यांनी 2 सप्टेंबर रोजीच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. Shankaracharya Passes Away
99 वा वाढदिवस साजरा : झोतेश्वर येथील परमहंसी गंगा आश्रमात स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनाची माहिती मिळताच, आश्रमात भाविकांची गर्दी झाली. शंकराचार्यांनी 9 दिवसांपूर्वी 2 सप्टेंबर रोजी त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भाविकांना प्रचंड दु:ख झाले आहे. अंतीम दर्शनासाठी व्हीआयपी लोक आश्रमात येऊ लागल्याने, तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
शास्त्रांचे शिक्षण काशी येथे घेतले : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म 2 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरजवळील दिघोरी गावात, एका ब्राह्मण कुटुंबात वडील धनपती उपाध्याय आणि आई गिरिजा देवी यांच्या पोटी झाला. आई-वडिलांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धार्मिक दौरे सुरू केले. त्या दरम्यान ते काशीला पोहोचले आणि येथे त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्या कडुन वेद-वेदांग, शास्त्रे शिकली. हा तो काळ होता जेव्हा भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी लढा सुरु होता.
दोन मठांचे शंकराचार्य होते: हिंदूंना एकत्र आणण्याच्या भावनेने, आदिगुरु भगवान शंकराचार्य यांनी १३०० वर्षांपूर्वी भारताच्या चारही दिशांना चार धार्मिक राजधानी (गोवर्धन मठ, शृंगेरी मठ, द्वारका मठ आणि ज्योतिर्मठ) बांधल्या. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य आहेत. हिंदू धर्मात शंकराचार्यांच्या पदाला खूप महत्त्व आहे, शंकराचार्यांना हिंदूंचे मार्गदर्शन आणि ईश्वरप्राप्तीचे साधन या विषयात हिंदूंना आदेश देण्याचे विशेष अधिकार आहेत.
उत्तराधिकारी कोण होणार : शंकराचार्य आश्रम, परमहंसी गंगा क्षेत्र, झोतेश्वरचे पंडित सोहन शास्त्री यांच्या कडून प्राप्त माहीती नुसार, दंडी स्वामी सदानंद सरस्वती आणि अविमुक्तेश्वरानंद हे ब्रह्मलिन शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे मुख्य शिष्य आहेत. त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, असे मानले जाते. स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांचा जन्म नरसिंहपूरच्या बरगी नावाच्या गावात झाला. पूर्वीचे नाव रमेश अवस्थी होते. वयाच्या १८ व्या वर्षी ते शंकराचार्य आश्रमात गेले. ब्रह्मचारी दीक्षा घेतल्याने त्यांचे नाव ब्रह्मचारी सदानंद झाले. बनारसमध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याकडून दांडीची दीक्षा घेतल्यानंतर ते दांडी स्वामी सदानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. सदानंद हे गुजरातमधील द्वारका शारदापीठात शंकराचार्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्याच वेळी अविमुक्तेश्वरानंद नंद सरस्वतीजी महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे झाला. पूर्वीचे नाव उमाकांत पांडे होते. विद्यार्थीदशेत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे विद्यार्थी नेतेही होते. तरुणपणी ते शंकराचार्य आश्रमात आले. ब्रह्मचारी दीक्षा घेतल्याने त्यांचे नाव ब्रह्मचारी आनंद स्वरूप झाले. बनारसमध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिल्यानंतर ते दांडी स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. शंकराचार्यांच्या प्रतिनिधी म्हणून उत्तराखंड बद्रिकाश्रमातील ज्योतिषपीठाचे काम ते हाताळत आहेत. Swami Sadanand Saraswati Maharaj, Swami Avimukteshwarananda