शाहजहांपूर (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून स्वतःला पेटवून घेतले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी जळालेल्या तरुणाला गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
तरुणाचा कुटुंबीयांवरच जाळण्याचा आरोप : प्रियकराने आरोप केला आहे की, तरुणीच्या कुटुंबीयांनी फोटो व्हायरल केल्याची तक्रार केली होती. त्याच्या चौकशीसाठी त्याला घरी बोलावण्यात आले होते. पण, घरी येण्यापूर्वीच मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला ओढत आपल्या घरात नेऊन पेटवून दिले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सध्या तरुणाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना रामचंद्र मिशन परिसरातील पोलीस स्टेशन मधील आहे.
मुलीच्या कुटुंबीयांची पोलिसात तक्रार : ठाणे रामचंद्र मिशन परिसरात राहणाऱ्या सद्दामचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तरुणाने प्रेयसीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली होती. मंगळवारी रात्री व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सद्दामने अचानक प्रेयसीच्या घरात जाऊन स्वतःला पेटवून घेतले. त्याच्या या हरकतीने परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकांनी लगेच 112 वर कॉल केला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जळालेल्या प्रियकराला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
तरुण गंभीररित्या भाजला : प्रियकराचा आरोप आहे की, मुलीच्या घरच्यांच्या तक्रारीनंतर त्याला घरी बोलावण्यात आले. घरी येण्यापूर्वीच मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला ओढत आपल्या घरी नेले आणि पेट्रोल टाकून पेटवून दिले, यात सद्दाम गंभीर भाजला. याप्रकरणी सीओ सिटी अखंड प्रताप सिंह सांगतात की, रामचंद्र मिशन परिसरात एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. तरुणाचे तरुणीसोबत संबंध होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
कानपूरमध्ये आई-मुलीला जिवंत जाळले : कानपूर देहातमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आई आणि मुलीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. कानपूर जिल्हा आणि तहसील प्रशासनाची टीम अतिक्रमणाखाली असलेले मंदिर पाडण्यासाठी गेली होती. यावरून पीडितेच्या कुटुंबीयांशी त्यांची बाचाबाची झाली. यादरम्यान मंदिराजवळील झोपडीला आग लागली. या आगीत आई आणि मुलीचा भाजून मृत्यू झाला. कुटुंबाला वाचवताना पीडितेचे वडीलही गंभीर जखमी झाले. मात्र प्रशासनाच्या पथकानेच घराला आग लावून आई-मुलीची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने या गरीब कुटुंबाला कसे धमकावले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.