ETV Bharat / bharat

उत्तर गोव्यात रात्री ११ नंतर मद्यबंदी, आजपासून निर्णय लागू

goa
goa
author img

By

Published : Feb 3, 2022, 6:06 PM IST

Updated : Feb 3, 2022, 6:44 PM IST

  • Goa | District Magistrate of North Goa has ordered that serving or selling of liquor in all the liquor bars, pubs, shops, clubs, shacks or any establishment should be closed every day by 11pm with immediate effect till the time Model Code of Conduct is in force in the State

    — ANI (@ANI) February 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

18:03 February 03

उत्तर गोव्यात रात्री 11 नंतर मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.

पणजी (गोवा) - लिकर बार, पब्ज, शॉप्स, क्लब, शॅक्स आणि इतर ठिकाणी रात्री ११ नंतर मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू असण्यापर्यंत या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार.

गोवा विधानसभा निवडणुकीकडे ( Goa Assembly Elections 2022 ) सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. गोव्याची राजधानी पणजी ही राजकीय अस्थिरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी केवळ काँग्रेस आणि भाजपच नाही, तर ममता बॅनर्जींची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची 'आम आदमी पार्टी'ही आपला दबदबा आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला निवडणूक होईल. तर १० मार्चला निकाल लागणार आहे.

2017 विधानसभा निवडणूक -

2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly Elections 2017 ) 40 पैकी 17 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, लुईझींनो फलेरो आणि दिगंबर कामत यांच्या मुख्यमंत्री पदावरून झालेल्या अंतर्गत वादात भाजपाने आपल्या 13 आमदारसह महाराष्ट्र गोमंतक पक्ष 3 आमदार, गोवा फॉरवर्ड 3 आमदार व 2 अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली.

2017 सालीचे पक्षीय बलाबल -

भाजपा13 आमदार
काँग्रेस17 आमदार
गोवा फॉरवर्ड3 आमदार
महाराष्ट्र गोमंतक पार्टी3 आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस1 आमदार
अपक्ष3 आमदार

2019 ला राजकीय परिस्थिती बदलली -

2019 ला ( गोवा विधानसभा निवडणूक 2019 ) भाजपचे तत्कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा व त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे निधन झाले. त्यातच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर या दोन काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला होता, म्हणून विधानसभेतील पक्षिय बलाबल होते.

भाजपा12 आमदार
काँग्रेस14 आमदार

Last Updated : Feb 3, 2022, 6:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.