ETV Bharat / bharat

Railway Fare : कोरोनामुळे बंद झालेल्या रेल्वे भाड्यात 'या' लोकांना पुन्हा मिळू शकते सवलत, वाचा सविस्तर

कोरोना महामारीच्या काळात बिकट आर्थिक स्थिती पाहता रेल्वेने तीन श्रेणी वगळता सर्व भाडे सवलती बंद केल्या होत्या. परंतु आज, राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना दिलेली पुन्हा सुरु करू शकते.

Railway Fare
रेल्वे भाड्यात सवलत
author img

By

Published : Feb 7, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सवलत बहाल करू शकते. खरं तर, कोविड महामारीच्या काळात खराब आर्थिक स्थिती पाहता, रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसह तीन श्रेणी वगळता इतर सर्वांसाठी भाडे सवलत बंद केली होती. साथीच्या आजारापूर्वी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 50 टक्के सूट मिळायची. आता कोविड 19 चा धोका कमी होऊन आणि देशातील इतर सर्व व्यवहार पूर्णपणे सामान्य झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना हा दिलासा मिळालेला नाही.

ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सुट : दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली सूट पूर्ववत करू शकते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतीय रेल्वेने 2019-20 मध्ये प्रवासी तिकिटांवर 59837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, जी प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सरासरी 53 टक्के सवलत आहे.

सूट पुनर्संचयित करण्याची शिफारस : ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याचा विचार करत असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले. रेल्वे अजूनही या विषयावर विचार करत आहे, परंतु रेल्वे आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान स्लीपर आणि 3 एसी सवलतींचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच वेळी, संसदीय पॅनेलने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सूट पुनर्संचयित करण्याची शिफारस देखील केली आहे.

काय सांगतो यंदाचा रेल्वे बजेट : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेला एकूण 2.4 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक वाटप आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजस सारख्या प्रमुख गाड्यांचे 1,000 हून अधिक डबे नूतनीकरण करण्याची योजना रेल्वे आखत आहे. या डब्यांचे आतील भाग प्रवाशांच्या सोयीनुसार सुधारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलद गतीने प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेस अधिक ठिकाणी सुरू करण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा : Railway Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद ; वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे वाढवणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.