लखनऊ : पाकिस्तानातून अवैधरित्या नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर गुलाम आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांची प्रेम कहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांचीही उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने ( ATS ) दोन दिवस कसून चौकशी केली. यावेळी सीमा हैदरची सलग चौकशी करत एटीएसने सीमाला 13 प्रश्न विचारले. मात्र सीमाने एटीएसच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र सीमाने न डगमगता दिलेल्या उत्तराने एटीएसचे अधिकारीही अवाक् झाले आहेत.
सीमा हैदरची एटीएसकडून कसून चौकशी : पब्जी गेम खेळताना पाकिस्तानातील कराची येथील राहणाऱ्या सीमा हैदरची भारतातील सचिन मीनासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. यातच सीमा हैदर चार लेकरांना घेऊन नेपाळमार्गाने भारतात घुसली आहे. उत्तर प्रदेशातील सचिन मीनासोबत सध्या सीमा हैदर राहत आहे. मात्र सीमा हैदर पाकिस्तानसाठी घुसखोरी करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे सीमाची पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या दोन दिवसात एटीएस नोएडाच्या सेक्टर 58 ऑफिसमध्ये सीमा, तिची दोन मुले, सचिन यांना पोलिसांनी विविध प्रश्न विचारले. सीमासोबत नोएडा पोलीस दलातील महिला अधिकारी उपस्थित होत्या. एटीएस अधिकाऱ्यांनी आधी तिचे दोन पासपोर्ट सीमासमोर ठेवले आणि प्रश्न विचारले.
प्रश्न १ : या पासपोर्टमध्ये मूळ पासपोर्ट कोणते आहे ?
सीमा हैदर : मी गेल्या दहा दिवसापासून सांगत आहे की, अगोदरच्या पासपोर्टमध्ये फक्त सीमा लिहिलेले होते. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळेच दुसरा पासपोर्ट सीमा गुलाम हैदर यांच्या नावावर करण्यात आला. मंगळवारीही सीमा हैदरने एटीएससमोर तेच उत्तर दिले.
प्रश्न 2 : तुमचा भाऊ आणि काका पाकिस्तानी सैन्यात आहेत का? त्यांनी तुम्हाला इथे पाठवले आहे का ? आयएसआयच्याने तुम्हाला भारतात येण्यास सांगितले आहे?
सीमा हैदर : मी माझ्या भावाला आणि काकांना वर्षानुवर्षे भेटले नाही. एका टीव्ही चॅनलमध्ये मला आयएसआयचा एजंट म्हटले गेले. त्यावेळी मला ही ISI काय आहे, हे भारतात आल्यावर मला कळले. मी फक्त सचिनसाठी नेपाळमार्गे भारतात आले आहे.
प्रश्न 3 : तुम्ही कराचीमध्ये राहून ISI चे नाव ऐकले नाही, हे कसे शक्य आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य पाकिस्तानी सैन्यात आहेत. आणि तुम्ही स्वतः स्मार्टफोन वापरता, PubG सारखे गेम खेळता. मग तुम्हाला ISI बद्दल माहिती कशी नाही ?
सीमा हैदर : माझे अर्धे आयुष्य मुले पैदा करण्यात आणि त्यांचे संगोपन करण्यात गेले. गेली पाच वर्षे मी फक्त वेळ घालवण्यासाठी PUBG खेळायचे. अशा परिस्थितीत आयएसआयसारखे शब्द ऐकायला वेळ मिळाला नाही.
प्रश्न 4: आयएसआय शब्द ऐकायला वेळ मिळाला नाही ? तुमचे इंग्रजी तर खूप चांगले आहे. तुम्ही कुठे आणि कधी शिकलात? तुम्ही तर फक्त पाचवीपर्यंतच शिकला आहात ?
सीमा हैदर : मी जे काही शिकले ते 2019 नंतरच शिकले. मी पबजी खेळायला सुरुवात केली. यामध्ये मी शिकलेल्या मुलांसोबत खेळायची, त्यामुळे मी त्यांच्याकडून बोलता बोलता इंग्रजी शिकायची.
( एटीएस अधिकाऱ्याने पानावर इंग्रजीत काही ओळी लिहून सीमाला वाचायला दिल्या आणि सीमाने लगेच वाचून दाखवले.)
प्रश्न 5 : तुम्हाला तुमची स्वतःची भाषा उर्दू, अरबी, सिंधी चांगली बोलता येत नाही. परंतु तुम्ही हिंदी आणि इंग्रजी खूप चांगले बोलत आहात, यासाठी तुम्हाला कोणी प्रशिक्षण दिले? भारतातील लोकांमध्ये लवकर मिसळता यावे यासाठी तुम्हाला येथे शुद्ध हिंदीत बोलण्यास सांगितले होते का? आम्ही ऐकले आहे की तुम्ही शरण, अनर्थ असे शब्द अत्यंत शुद्धपणे बोलता ?
सीमा हैदर : मला कोणी शिकवले नाही, मी अनेकदी सांगितले आहे, इथे फक्त मी माझ्या प्रेमासाठी आले आहे. मला ना कोणी प्रशिक्षण दिले आहे, ना कोणी पाठवले आहे. सचिनशी बोलताना मी हिंदी बोलणे शिकले आहे.
प्रश्न 6 : सचिन मीना स्वतः हिंदी नीट बोलत नाही. त्याच्या भाषेत पश्चिमी यूपीचा टच आहे, त्यापेक्षा तुम्ही जे बोलत आहात ते एखाद्या प्रशिक्षित हिंदीसारखे आहे, जाणकार व्यक्ती बोलत आहे असे वाटते ?
सीमा हैदर : या प्रश्नाला मात्र सीमा हैदरने कोणतेही उत्तर दिले नाही.
प्रश्न 7 : 4 जुलैला तुम्ही बसने नेपाळहून सचिनकडे आलात तेव्हा तुमचा मोबाइल काम करत नसल्याचे तुम्ही पोलिसांना सांगितले. त्यामुळे बस चालकाच्या फोनवरून सचिनला फोन करत होता. नोएडा पोलिसांनी तुमच्याकडून चार मोबाईल आणि चार सिम जप्त केले आहेत. तुम्ही इतके मोबाईल घेऊन काय करत होता आणि ते का तोडले?
सीमा हैदर : मी नेपाळहून भारतात आले तेव्हा माझे पाकिस्तानी सिम काम करत नव्हते. मी सचिनकडे आले तेव्हा त्याने मला नवीन सिम आणून दिले. पाकिस्तानच्या लोकांनी माझा माग काढू नये म्हणून मोबाईल तोडला होता.
प्रश्न 8 : सचिनने एक सिम आणून दिले मात्र बाकीचे सिम कार्ड कसे आले?
सीमा हैदर : मला आठवत नाही.
प्रश्न 9 : तुम्ही सर्व सिम वेगवेगळ्या मोबाईलमध्ये ठेवले आणि त्या सर्वांमध्ये WhatsApp चालू होते. तुम्ही टाकलेला प्रोफाईल फोटो कुठल्यातरी मुलीचा आहे. दुसऱ्या फोनमध्ये प्रोफाईल फोटोला काश्मीरच्या पर्वतांचे चित्र आहे? हे सर्व तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून करत आहात?
सीमा हैदर : मी कोणतेही व्हॉट्सअॅप अकाऊंट बनवलेले नाही आणि फोटोही पोस्ट केले नाहीत.
प्रश्न 10 : दुबईमार्गे दोनदा नेपाळला यायला खूप पैसे लागले असतील. एवढा पैसा आला कुठून, तुम्ही स्वतः भाड्याने राहतात. तुमचे बाबा दोन वर्षापूर्वी तुम्हाला सोडून गेले आहेत. नवऱ्याशी तुमचे संबंध चांगले नाहीत, भाऊ वर्षानुवर्षे भेटला नाही, मग पैसे कसे मिळवायचे ? जर तुम्हाला कोणी मदत केली असेल तर खरे सांगा, आम्ही तुम्हाला पाकिस्तानात पाठवणार नाही आणि तुरुंगात नाही. भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करु ?
सीमा हैदर : दोन्ही वेळा दुबईवरुन नेपाळला जाण्यात एकूण सात लाख रुपये खर्च झाले. माझ्या नावावर असलेले घर मी विकले होते. मी त्या घरात राहत नव्हते. मी माझे दागिने विकले, त्यातून काही पैसे मिळाले. माझे पती गुलाम यांना मी दुबईला पाठवले होते, त्यामुळे मी माझ्यासाठीही पैशांचे जुगाड करू शकते ना. मी अनेकवेळा सांगितले आहे की मला भारतात येण्यासाठी कोणीही मदत केली नाही.
प्रश्न 11 : तुम्ही सचिन व्यतिरिक्त भारतात आणखी कोणाला ओळखता का?
सीमा हैदर : हो, पण नीट नाही. जेव्हा मी पाकिस्तानात होती, तेव्हा सचिनला ओळखण्यापूर्वी मी PUBG गेम आणि Facebook च्या माध्यमातून काही मुलांशी गप्पा मारत असे. फक्त टाईमपास करण्यासाठी बोलत होते मी. मी त्याला माझ्याबद्दल फार काही सांगितले नाही आणि त्याने मला काही सांगितले नाही. मात्र ते सगळे दिल्लीचे रहिवासी होते.
प्रश्न 12 : तुम्ही तुमच्या आयुष्यात काय काय केले आहे? तुमचे खरे वय किती आहे? तुम्ही तुमचे वय 27 वर्षे सांगता, मात्र 2014 मध्ये तुमचे गुलामशी लग्न झाले, तेव्हा तुमचे वय 20 वर्षे होते, याचा अर्थ आता ते 29 वर्षे असावे. दोन्ही पासपोर्टमध्ये तुमची जन्मतारीख 2002 लिहिली आहे, म्हणजे पासपोर्टनुसार तुम्ही 21 वर्षांच्या आहात?
सीमा हैदर : मी फक्त 27 वर्षांची आहे. पासपोर्टमध्ये काहीतरी चूक झाली असावी. सगळीकडे पैसा चालतो. पैसे दिले नाही, तर ते काहीतरी चुकीचे करतात. माझे गुलामसोबत घाईघाईत लग्न झाले होते, त्यामुळे लिहिण्यात काही चूक झाली असावी.
प्रश्न 13 : भारतात येण्याचा तुमचा खरा उद्देश काय आहे ?
सीमा हैदरचे : मी माझ्या चार मुलांसह पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे फक्त आणि फक्त सचिनसाठी आले आहे. नागरिकांना कळले तर वेगळे काही घडेल, अशी भावना मला पूर्वीपासून होती, जे आज घडत आहे. त्यामुळे आम्ही आणि सचिन भाड्याच्या घरात राहत होतो. मी आता थकले आहे.
चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवले एनआयए, एटीएसला : उत्तर प्रदेशातील एटीएस अधिकाऱ्यांनी सोमवार आणि मंगळवारी सीमा हैदरला समान प्रश्न विचारले. सीमा हैदरने पाकिस्तान आणि तिच्या घराबद्दल सांगितलेल्या बाबींविषयी अधिकाऱ्यांनी तिच्या दोन अल्पवयीन मुलांनाही विचारले. यामधून अधिकाऱ्यांनी त्यांची तुलना केली. एटीएस अधिकाऱ्यांनी चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आयबी, एनआयए आणि यूपी एटीएसच्या मुख्यालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चौकशीत एटीएसला काय खटकले : सीमाच्या एकाही उत्तरावर एटीएसचे अधिकारी समाधानी नाहीत. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे ती ऐकताच समोर ठेवत होती. चौकशीदरम्यान सीमाने तिच्या मुलांबाबत एकदाही विचारणा केली नाही. तिच्या दोन मुलांना तिच्यासोबत कार्यालयात आणून स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले. सीमाने दोन्ही दिवशी तीच उत्तरे दिली. त्यात इकडून तिकडे एकही ओळ नव्हती. एवढेच नाही तर ती अजिबात घाबरली नाही.
हेही वाचा -