भुवनेश्वर: ओडिशाच्या एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने दावा केला आहे की कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा आहे आणि युनायटेड किंगडममधून ऐतिहासिक पुरी मंदिरात परत आनावा यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर, तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स राजा बनला आहे आणि नियमांनुसार, 105-कॅरेटचा हिरा त्याची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला, जी राजाची पत्नी आहे, यांच्याकडे जाईल.
श्री जगन्नाथ सेना या पुरी येथिल संस्थेने 12व्या शतकातील कोहिनूर हिरा मंदिरात परत आणण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांच्या हस्तक्षेपासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. कोहिनूर हिरा श्री जगन्नाथ भगवान यांचा आहे. ते आता इंग्लंडच्या राणीकडे आहे. कृपया आमच्या पंतप्रधानांना विनंती करा की तो भारतात आणण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत. महाराजा रणजित सिंह यांनी आपल्या मृत्यूपत्रात ते देव जगन्नाथ यांना दान केल्याचा उल्लेख आहे. असे संस्थेच्या निमंत्रक प्रिया दर्शन पटनायक यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या नादिरशहाविरुद्ध लढाई जिंकल्यानंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी पुरी च्या जगन्नाथाला ला हिरा दान केला होता, असा दावा पटनायक यांनी केला आहे. 1839 मध्ये रणजित सिंग यांचा मृत्यू झाला आणि 10 वर्षांनंतर ब्रिटिशांनी कोहिनूर त्यांचा मुलगा दुलीप सिंग यांच्याकडून काढून घेतला, परंतु पुरी येथे भगवान जगन्नाथ यांना हा कोहिनूर देण्यात आला होता, असे इतिहासकार आणि संशोधक अनिल धीर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे.
पटनाईक यांनी सांगितले की त्यांनी या संदर्भात राणीला एक पत्र लिहुन सगळी बाब कळवली होती त्यानंतर, 19 ऑक्टोबर 2016 रोजी बकिंगहॅम पॅलेसकडून त्यांना एक उत्तर मिळाले, ज्यात या संदर्भात थेट युनायटेड किंगडम सरकारकडे अपील करण्यास सांगितले होते. कारण तीथला कारभार त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार चालतो. त्या पत्राची प्रत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनासोबत जोडण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
सहा वर्षा पुर्वी पत्र व्यवहार केला त्या नंतर या मुद्द्यावर काही का केले नाही असे विचारले असता पटनाईक यांनी सांगितलेकी त्यांना इंग्लंडला भेट देण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला होता, ज्यामुळे त्या यूके सरकारकडे या संदर्भातील बाजु मांडू शकल्या नव्हत्या. महाराजा रणजित सिंग यांचे वारस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असे विखुरले आहेत तसेच त्यांचे अनेक दावेदार आहेत असे असले तरी या संस्थेने केलेला दावा योग्य आहे, असे धीर यांनी म्हटले आहे.
महाराजा रणजित सिंह यांच्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की त्यांनी भगवान जगन्नाथ यांना कोहिनूर दान केला होता. हे दस्तऐवज ब्रिटिश लष्कराच्या अधिकाऱ्याने प्रमाणित केले होते, त्याचा पुरावा दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागारात उपलब्ध आहे, असे इतिहासकारांचे म्हणने आहे. ओडिशातील बिजू जनता दलाचे खासदार भूपिंदर सिंह यांनी 2016 मध्ये राज्यसभेत हिरा परत आणण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
लेखक आणि इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी त्यांच्या कोहिनूर या पुस्तकात नमूद केले आहे की बाल शीख वारस दुलीप सिंग यांनी राणी व्हिक्टोरियाला हिरा समर्पण केल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. सुप्रीम कोर्टात भारत सरकारची भूमिका अशी होती की अंदाजे 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमत असलेला हा हिरा ब्रिटीश शासकांनी चोरला नाही किंवा जबरदस्तीने घेतला नाही, परंतु पंजाबच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी तो ईस्ट इंडिया कंपनीला दिला. जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक मानला जाणारा कोहिनूर 14 व्या शतकात दक्षिण भारतातील कोल्लूर कोळसा खाणीत सापडला होता.