ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी वाजपेयींना अभिवादन करत असल्याचे पाहून मोदींना 'राजधर्मा'ची आठवण व्हावी -काँग्रेस - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आदरांजली वाहिली आहे. (Rahul Gandhi) दरम्यान, राहुल गांधी वाजपेयी यांना आदरांजली वाहत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण व्हायल हवी असा टोला लगावला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

राहुल गांधी यांचे वाजपेयी यांना अभिवादन
राहुल गांधी यांचे वाजपेयी यांना अभिवादन
author img

By

Published : Dec 26, 2022, 5:45 PM IST

नवी दिल्ली - पक्षीय भावनेच्या पलिकडे जावून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Congress spokesperson Supriya Shrinate) राहुल यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली आहे. 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल यांनी आज सोमवार (दि. 26 डिसेंबर)रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

राजकारण मोठ्या मनाने केले जाते - काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, 'मला वाटतं राहुल गांधींना अटलजींच्या स्मारकाला अभिवादन करताना पाहून पंतप्रधानांना त्यांच्या राजधर्माची आठवण झाली पाहिजे, जो राजधर्म अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना शिकवला होता. (2002)मध्ये वाजपेयी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली होती. आज मोदी पंतप्रधान आहेत असे म्हणत राजकारण मोठ्या मनाने केले जाते आणि आज राहुल गांधी ते करत आहेत असही त्या म्हणाल्या आहेत.

वाजपेयींच्या समाधीवर गांधी घराण्यातील पहिलाच व्यक्ती - राहुल गांधी यांनी अगोदर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधी 'वीर भूमी' येथे आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे 'शक्तीस्थळ', नेहरूंचे 'शांती वन', लाल बहादूरांचे 'विजय घाट', महात्मा गांधींचे 'राजघाट' आणि वाजपेयींचे 'सदैव अटल' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींच्या समाधीवर गांधी घराण्यातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा उच्चपदस्थ नेता पहिल्यांदाच पोहोचला ही मोठी गोष्ट आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती.

आठ दिवसांची विश्रांती - राहुल गांधी शनिवार (दि. 25 डिसेंबर)रोजी संध्याकाळीच या नेत्यांच्या समाधीचे दर्शन घेणार होते. मात्र, शनिवारी सायंकाळी पदयात्रा पूर्ण होण्यास वेळ लागल्याने कार्यक्रम बदलण्यात आला. 'भारत जोडो यात्रेत सुमारे तीन हजार किलोमीटरचे अंतर पार करून दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रमुख नेत्यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि इतर अनेक 'भारत यात्री' शनिवारी पदयात्रा काढत दिल्लीत दाखल झाले होते. कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या नऊ राज्यांमधून गेली आहे. सुमारे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर ही यात्रा उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि शेवटी जम्मू-काश्मीरकडे जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.