मा. गो वैद्य यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
जेष्ठ विचारवंत पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवारी निधन झाले. आज रविवार (ता. २०) त्यांच्या पार्थिवावर नागपूरच्या अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच संघाकरिता संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या काही निवडक स्वयंसेवकांमध्ये माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे मा. गो. वैद्य यांचा समावेश होतो. संघाने दिलेली जबाबदारी सांभाळण्यात स्वत:ला झोकून देणारे मा. गो. वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला. मा. गो. वैद्य यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तरोड्यात आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांच्या मावस काकाने त्यांना नागपुरात, पुढील शिक्षणासाठी आणले.

मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यात ते राज्यात रक्ताचा तुटवटा निर्माण झाला आहे. याविषयी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. याशिवाय ते विविध विषयावर माहिती देतील.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबादमध्ये
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते एमजीएम कॉलेज येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.

विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर दौऱ्यावर
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आजपासून दोन दिवसांच्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत.

शेतकरी आंदोलनाचा आज २५ वा दिवस
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी पंजाब हरियाणा या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजचा या आंदोलनाचा २५ वा दिवस आहे. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात या विषयावरून चर्चा झाली आहे. पण यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. दिवसागणिक हे आंदोलन चिघळत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावरून एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने हे तीन कायदे स्थगित ठेवता येतील का?, याचीही शक्यता पडताळून पहावी, असे केंद्र सरकारला सूचवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आंदोलनादरम्यान, २० हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्याचा आज दुसरा दिवस
गृहमंत्री अमित शाह बंगालच्या बोलपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते रोड शो देखील करणार आहेत. दुपारी ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विश्व भारती विद्यापीठाला भेट देणार आहेत.

योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ३ दिवसीय कृषी संम्मेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

भोपालमध्ये आज होणार यूपीएससी परीक्षा
भोपालमध्ये आज यूपीएससी परीक्षा होणार आहे. ही परिक्षा ६ केंद्रावर घेतली जाणार आहे.

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना आज
पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्याची टी-२० मालिका उभय संघात खेळली जात आहे. उभय संघात आज दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. पहिला सामना ५ गडी राखून जिंकत यजमान न्यूझीलंड संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात देखील विजय मिळवून मालिका जिंकण्याचा मानस न्यूझीलंडचा आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

सोहेल खानचा आज वाढदिवस
बॉलिवूड अभिनेता सोहेल खानचा आज वाढदिवस. २० डिसेंबर १९६९ मध्ये सोहेलचा जन्म झाला. सोहेलने वडिलांप्रमाणे स्क्रिप्ट रायटिंगसोबत प्रोडक्शनमध्येही आपले नशीब आजमावले. पण कोणत्याच क्षेत्रात त्याला यश मिळाले नाही.
