आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अखेरचा दिवस
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल (सोमवार) पासून सुरूवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले आहेत. मागील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि अवकाळी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी आज कच्छमध्ये नविन कामांची पायाभरणी करणार
कच्छने सर्व क्षेत्रासह कृषी छेत्रात उल्लेखणीय ठसा उमटवला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कच्छमध्ये नविन विकास कामांची पायाभरणी करणार आहेत.
शेतकरी आंदोलन सुरू
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे परत घ्या, या मागणीसाठी पंजाब, हरियाणासह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. हे आंदोलन 19 दिवस झाले सुरू असून आज देखील शेतकरी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.
पुणे नव्या कृषी कायद्यावर आज चर्चा सत्र
समाज विज्ञान अकादमीच्या वतीने आज पुण्यात नवे कृषी कायदे आणि शेती बाजार व्यवस्था या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार भवनमध्ये हे चर्चा सत्र होणार असून किसान सभा नेते डॉ. अजित नवले उपस्थित राहणार आहेत.
अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज होणार जाहीर
अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. या यादीकडे शेकडो पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. यंदा अकरावी प्रवेशाच्या तीनच फेऱ्या होणार असून यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
वाढवण बंदर प्रकरण : आज किनारपट्टी बंद
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला फक्त वाढवण आणि आजूबाजूच्या तीन चार गावांचाच विरोध आहे. असे यंत्रणांना भासवून किनारपट्टीवरिल इतर गावात बंदरातील कामांच्या ठेक्यासह अन्य अमिषे देणाऱ्यांविरोधात आज किनारपट्टीवरिल सर्व गावे व्यवहार ठप्प ठेवणार आहेत.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनाच्या पार्श्वभूमिवर पत्रकार परिषद
ऐतिहासिक भीमा कोरेगाव लढाईच्या दिनानिमित्त पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला राज्यभरातील हजारो दलित बांधव येतात. या पार्श्वभूमीवर भीमा कोरोगाव कमिटीचे चेअरमन राहुल धंम्बाळे यांची पत्रकार परिषद आज दुपारी एक वाजता होणार आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आज सुरजपुर आणि बलौदा बाजार जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते विकास कामाचा शुभारंभ करतील.
कृषी विधेयकाविरोधात आज दिल्ली काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते भाजपा मुख्यालयाला घेराव घालणार आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज दिवसभर विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत.