सेडम (कलबुर्गी) - सेडम पोलिसांना एका हाय-टेक वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. हा हाय-प्रोफाईल वेश्याव्यवसाय शहरातील सारा लॉजमध्ये सुरू होता. पोलिसांनी या लॉजवर छापा मारून १० जणांना अटक केली आहे. हा लॉज शहरातील बस स्थनकाच्या समोर व मध्यवर्ती ठिकाणी होता.
गुन्हे अन्वेशनचे सीपीआय राजशेखर हलगोडी, पीएसआय नारायण गौडा व पीएसआय अय्यप्पा भिमावरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन लॉज मालकांसह १० जणांना अटक केली असून आठ महिलांची सुटका करण्यात आली आहे
अटक करण्य़ात आलेले आरोपी कलबुर्गी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील निवासी आहेत. पोलिसांनी लॉज सील केले असून सेडम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा
अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला