ETV Bharat / bharat

कोरोनाची दुसरी लाट संपली नाही, डेल्टा प्लस कदाचित धोकादायक नसेल-एन. के. अरोरा - Delta Plus variant

कोव्हिड 19 कार्यकारी गटाचे (NTAGI) चेअरमन एन. के. अरोरा म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. डेल्टा प्लस हा धोकादायक आणि त्रासदायक ठरणार नाही.

corona Second wave
कोरोनाची दुसरी लाट
author img

By

Published : Jul 15, 2021, 10:35 PM IST

नवी दिल्ली - भारत अजूनही कोरोनाची दुसरी लाट अनुभवत आहे. ईशान्यकडील राज्यांसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाशी लढा सुरू असल्याचे सरकारी कोव्हिड तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कोव्हिड 19 कार्यकारी गटाचे (NTAGI) चेअरमन एन. के. अरोरा म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. डेल्टा प्लस हा धोकादायक आणि त्रासदायक ठरणार नाही. डेल्टा व्हेरियंट हा देशातील काही राज्यांमध्ये आढळला आहे. काही तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट अखेर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, तिसरी लाट ही एप्रिल ते जूनमधील कोरोनाच्या लाटेसारखी भयानक नसेल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा-जीईई मेन्सची चौथ्या टप्प्यातील परीक्षेची बदलली तारीख; धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांचे पालन करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच लसीकरण हे कोरोना विरोधात लढ्यात महत्त्वाचे साधन असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हेही वाचा-पी. एस. श्रीधरन यांनी गोव्याच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ

लशीमुळे संसर्ग थांबू शकत नाही-

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महामारी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख समरिन पांडा यांनी तिसऱ्या लाटेबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणात लशी उपलब्ध असणे हे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधात प्रभावी गोष्ट आहे. मात्र, त्यांची क्षमता ही वेगवेगळ्या स्ट्रेनसाठी वेगवेगळी असते. लशीमुळे संसर्ग थांबू शकत नाही. मात्र, रोगापासून संरक्षण मिळते, असे पांडा यांनी सांगितले.

हेही वाचा-अजब माकडाची गजब कहाणी... दारुच्या दुकानात जाऊन केले हे कृत्य

पंतप्रधानांनी तिसऱ्या लाटेबाबत जनतेला केले सावध

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रासह देशाला मोठा फटका बसला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काही ठिकाणी तर परिवारातीलच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जून महिन्यात ही लाट ओसरताना दिसत असल्यावर राज्य सरकारसह केंद्रानेही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र, निर्बंध हटवल्यावर जनता आणखीनच बेजबाबदार पणे वागतंय, असे निदर्शनास आले असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला नुकतेच इशारा दिला आहे.

ऑक्टोंबर ते नोव्हेंबर तिसरी लाट येण्याची शक्यता

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट (covid third wave) ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पुन्हा येऊ शकते, असे कोरोना मॉडेलच्या सरकारी समितीतील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले आहे. संशोधक मनिंद्र अग्रवाल हे सध्या 'सूत्र मॉडल' वर काम करत आहे. ज्यात कोरोनाच्या गणितीय मॉडेल्सचा वापर केला जात आहे. ते म्हणाले की, या कोरोना विषाणूचा नवीन संसर्ग निर्माण झाल्यास तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणावर फैलाव हेऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.