ETV Bharat / bharat

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारपासून; कोणाला घेता येणार लस?

देशभरातील दहा हजार सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख ६७ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर खूप कमी प्रमाणात तक्रारी आल्याचा दावा केला आहे.

author img

By

Published : Feb 27, 2021, 11:56 AM IST

कोरोना लस
कोरोना लस

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १ मार्चपासून म्हणजेच सोमावारपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यासंबंधीचा निर्णय २४ फेब्रुवारीच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना सरसकट आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात आली होती.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेची माहिती दिली. भारतात कोरोना लसीकरण यशस्वीरित्या सुरू असल्याचेही जावडेकर म्हणाले होते.

दहा हजार सरकारी रुग्णालयांत लसीकरण -

देशभरातील दहा हजार सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख ६७ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर खूप कमी प्रमाणात तक्रारी आल्याचा दावा सरकारने केला आहे.

खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागणार -

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना मोफत लस देण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयात लस घेताना पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, सरकारी रुग्णालयात लस मोफत असणार आहे. खासगी रुग्णालयात लसीची किंमत अद्याप ठरविण्यात आली नाही. त्याची घोषणा लवकरच होणार आहे. लस निर्मिती कंपन्या आणि रुग्णालयांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

दोन लसींना आणीबाणीच्या काळात वापराची परवानगी -

देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात झाली होती. लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही कोरोना योद्ध्यांनी लस घेणे टाळले. काही केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले. आणीबाणीच्या काळात वापरासाठी भारत सरकारने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना परवानगी दिली आहे. रशियाच्या स्पुटनिक कंपनीने आणीबाणीच्या वापरासाठी परवाना मिळण्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.