ETV Bharat / bharat

Councilors Fight In MCD : आप, भाजप नगरसेवकांनी एकामेकांना चोपले, भाजपचे एक मत बेकायदेशीर ठरवल्यामुळे गोंधळ - Delhi Municipal Corporation

दिल्ली महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होणार होती. सकाळी पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली. दुपारी २.३० वाजता मतदान प्रक्रिया संपली. दरम्यान, महापौर शैली ओबेरॉय यांनी भाजपचे एक मत बेकायदेशीर ठरवले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली.

Councilors Fight In MCD
आप, भाजप नगरसेवकांनी एकामेकांना चोपले
author img

By

Published : Feb 24, 2023, 9:59 PM IST

Updated : Feb 24, 2023, 10:15 PM IST

आप, भाजप नगरसेवकांनी एकामेकांना चोपले

नवी दिल्ली : एमसीडी ( दिल्ली महानगरपालिका ) सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. नगरसेवकांनी केलेल्या कृत्यामुळे सभागृहाच्या पंपरेला तडा गेला. महिला नगरसेवक एकमेकांचे केस ओढत असताना पुरुष नगरसेवक एकामेकांना चपलां मारुन फेकत होते. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपचे नगरसेवक फेरमतमोजणीची मागणी करत असताना अचानक काही नगरसेवक महापौरांच्या दिशेने पुढे आहे. तेथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी महापौरांच्या खुर्चीजवळ जात महापौरांची खुर्ची उचलून फेकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

  • #WATCH | Delhi: AAP Councillor, Ashok Kumar Maanu who collapsed at Delhi Civic Centre minutes back, appears before media with other Councillors of his party.

    They say, "They are so shameless that they attacked even women and the Mayor. BJP goons did this." pic.twitter.com/dbz4xE8FW9

    — ANI (@ANI) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक नगरसेवक बेशुद्ध : या धक्काबुक्कीनंतर महापौरांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी सभामंडपातून बाहेर पडले. एक मत अवैध ठरवून महापौर निकाल जाहीर करणार होते, असे बोलले जात होते, मात्र, मतांची मोजणी व्यवस्थित झालीच पाहिजे, यावर भाजप नगरसेवक ठाम होते. या हाणामारीत एक नगरसेवक बेशुद्ध पडला. भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य पदाचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांनी स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत फेरमतमोजणी न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.

केवळ 242 सदस्यांनी केले मतदान : स्थायी समितीच्या 6 सदस्यांसाठी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत मतदान झाले. 250 सदस्यीय MCD मध्ये केवळ 242 सदस्यांनी मतदान केले. यावेळी 8 काँग्रेस नगरसेवक अनुपस्थित राहिले. मतमोजणीवेळी एक मत अवैध ठरल्याने भाजपच्या नगरसेवकांनी फसवणूक, चोर-चोर अशा घोषणा दिल्या.

  • #WATCH | Ruckus breaks out at Delhi Civic Centre once again as AAP and BJP Councillors jostle, manhandle and rain blows on each other. This is the third day of commotions in the House. pic.twitter.com/Sfjz0osOSk

गदारोळामुळे निवडणूक लांबली : सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 22 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक पार पडली. त्याच दिवशी स्थायी समितीची निवडणूकही होणार होती. 47 नगरसेवकांनीही मतदान केले होते, मात्र यादरम्यान पेन आणि मोबाईल घेऊन गेल्याच्या प्रकरणावरून गदारोळ झाला. यानंतर निवडणूक थांबली. सुमारे 18 तास निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सभागृहाचे कामकाज 13 वेळा तहकूब करावे लागले. त्यानंतरही हे प्रकरण निकालात निघाले नसताना शुक्रवारी सकाळपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

हेही वाचा -Sambhajinagar And Dharashiv Rename : औरंगाबाद झाले ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबाद झाले 'धाराशिव'; केंद्राची परवानगी

Last Updated : Feb 24, 2023, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.