ETV Bharat / bharat

स्टार प्रचारक वाद प्रकरण : कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते. आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

स्टार प्रचारक वाद प्रकरण : कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
स्टार प्रचारक वाद प्रकरण : कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
author img

By

Published : Nov 2, 2020, 3:27 PM IST

नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते. आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचा भंग केला असल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला होता. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ स्टार प्रचारक म्हणून निवडले गेले होते.

निवडणुकीचा प्रचार आता संपुष्टात आला आहे. उद्या मतदान होणार आहे. अशावेळी कमलनाथ यांची याचिका व्यर्थ आहे, असे मत सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी व्यक्त केले. ३० ऑक्टोबरला कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती. कमलनाथ यांनी सातत्याने निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन केले आहे, असे कारण देत आयोगाने ही कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यातील डबरा मतदारसंघात एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांना 'आयटम' म्हटले होते. या वक्तव्यानंतर कमलनाथ यांच्यावर मोठी टीका झाली होती. भाजपाने या वक्तव्यावरून काँग्रेसची कोंडी केली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. महिलांबाबत काँग्रेसची अशी मानसिकता असल्याचे मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते. तसेच निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.