ETV Bharat / bharat

CBSE ICSE Class 12 Exams मुल्यांकनाचे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले सर्व आक्षेप - SC rejects all objections to CBSE formula

सीबीएसई व आयसीएसईने १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता मुल्यांकनाचे फॉर्म्युले निश्चित केले आहेत. या फॉर्म्युल्यांना आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. हे सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळले.

CBSE Exam
सीबीएसई परीक्षा
author img

By

Published : Jun 22, 2021, 10:14 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालायाने १२ वीच्या सीबीएसई व आयसीएसईच्या परीक्षांच्या मुल्यांकनावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळली आहे. दोन्ही बोर्डाच्या निर्णयाला विद्यार्थी पाठिंबा देत आहेत. अशा स्थितीत बोर्डाचे निर्णय योग्य आणि सयुक्तिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

सीबीएसई व आयसीएसईने १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता मुल्यांकनाचे फॉर्म्युले निश्चित केले आहेत. या फॉर्म्युल्यांना आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. हे सर्व आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळले. फॉर्म्युला निश्चित करताना १३ तज्ज्ञांच्या समितीने सर्व मुद्दे विचारात घेतल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

हेही वाचा-महिला लेफ्टनंटचा मृतदेह झाडावर आढळला लटकलेल्या अवस्थेत...खुनाचा पतीवर आरोप

सीबीएसई आणि आयसीएसई स्वतंत्र संस्था असल्याने निर्णय घेऊ शकतात-

केवळ सीएलएटी, एनडी या परीक्षा होत आहे, त्याचा अर्थ सीबीएसईच्या परीक्षा पार पडाव्यात असा अर्थ होत नाही. प्रत्येक परीक्षेचे विद्यार्थी आणि व्यवस्थापन करणारे बोर्ड वेगळे आहे. त्यामुळे त्या बोर्डाने परीक्षा घेण्याची क्षमता आहे का, हे ठरवायचे आहे. सीबीएसई आणि आयसीएसई या स्वतंत्र संस्था आहेत. त्या निर्णय घेऊ शकतात असे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांनी निकालात म्हटले आहे.

हेही वाचा-काँग्रेसकडून कोरोनावर श्वेतपत्रिका जारी; तिसऱ्या लाटेपूर्वी तयारी करण्याचे सरकारला केले आवाहन

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ जूनच्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.