नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्या दरम्यान सुरक्षेतील चुकी संदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी होणार ( Petition filed in SC on lapse in security of PM Modi) आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश जस्टिस एन.व्ही. रमणा, जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस हिमा कोहली यांच्या पीठाने ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांची याचिका बुधवारी स्वीकारली. पंजाब दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या गडबडीमुळे (lapse in security of PM Modi) त्यांचा ताफा भटिंडा येथेच रोखण्यात आला होता. यानंतर प्रचारसभेला न पोहोचता पंतप्रधान दिल्लीला परतले होते. मनंदिर सिंग यांनी याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टाने याचिकेची एक प्रत संबंधीत राज्यालाही देण्याचे सांगितले होते, आणि शुक्रवारी यावर सुनावणी घेण्याचे म्हटले होते.
पंतप्रधान दौऱ्यासंबंधी पंजाब पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या सर्व बाबांची माहिती भटिंडा जिल्हा न्यायाधीशांनी ताब्यात घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने भटिंडा जिल्हा न्यायाधीशांना द्यावे, असे याचिकाकर्ते सिंग यांनी म्हटले होते.
सिंग यांनी म्हटले होते, की पंजाबात जे झाले आहे, ते पाहाता सुरक्षेसंबंधी निष्पक्ष चौकशी झाली (Investigation of security lapses) पाहिजे. या घटनेला कोण जबाबदार आहेत, हे स्पष्ट केले पाहिजे. जेणे करुन भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही.
वरिष्ठ वकील लॉयर्स व्हॉईस द्वारे दाखल केलेल्या याचिकेचा (petition filed by senior advocate Lawyer's Voice) संदर्भ देत होते, ज्यामध्ये सुरक्षेतील त्रुटी मुद्दाम करण्यात आल्याचे आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि सध्याच्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.